MLA Sangram Jagtap addressing supporters during his Hindutva statement, while Pratibha Shinde leads a Waqf Board protest in Jalgaon highlighting deep political contrasts within Ajit Pawar’s NCP. sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय? आमदार संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी भूमिका तर प्रतिभा शिंदे वक्फ बोर्ड बचाव आंदोलनात!

Jalgaon Ajit Pawar NCP Politics : ऐन दिवाळीच्या तोंडावर आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधाने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर डोळे वटारले. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सध्या नेत्यांवर कोणाचा वचक आहे की नाही? अशी स्थिती आहे.

Sampat Devgire

Jalgaon News, 29 Oct : ऐन दिवाळीच्या तोंडावर आमदार संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधाने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर डोळे वटारले. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सध्या नेत्यांवर कोणाचा वचक आहे की नाही? अशी स्थिती आहे.

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्याबाबत काळजीत असावेत. काही नेत्यांचा पक्षाची भूमिका आणि धोरण यापेक्षा व्यक्ति केंद्रित राजकारणाकडे कल दिसतो. ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना आमदार संग्राम जगताप यांनी टोकदार भूमिका घेतली. हिंदूंनी मुस्लिम व्यावसायिकांकडून दिवाळीला कोणतेही साहित्य घेऊ नये. ही भूमिका त्यांनी वारंवार मांडली. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाले.

ही घटना ताजी असतानाच पक्षाच्या धोरणाशी सुसंगत भूमिका जळगावच्या प्रतिभा शिंदे यांनी घेतली. पुरोगामी पार्श्वभूमी असलेल्या शिंदे यांनी केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलनात उडी घेतली. केंद्र शासनाच्या वक्फ संशोधन कायदा 2025 रद्द करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक संस्था, मशिदी, मदरसे आदी मालमत्ता त्या समाजाच्या प्रतिनिधींकडूनच नियंत्रित व्हाव्यात. केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. तसे केल्याने संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते, अशी भूमिका प्रतिभा शिंदे यांनी घेतली.

याबाबत जळगाव शहरात वक्फ बोर्ड बचाव आंदोलन झाले. यावेळी शेकडो समाज बांधवांनी अटक करून घेतली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्या. त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगताप हे भाजपला अनुकूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणारी भूमिका घेत आहेत. मुस्लिम समाजाविरुद्ध विधाने करून तणाव निर्माण करीत आहेत, अशी टीका होते.

दुसरीकडे प्रतिभा शिंदे यांनी मात्र मुस्लिम समाजाला दिलासा देणारी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात दोन नेते एकाच वेळी भिन्न भूमिका घेत असल्याने तो चर्चेचा विषय आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे पक्षाच्या नेत्यांवर नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT