Lavni Dance Controversy: राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीची ‘सुपारी‘ कोणी घेतली? नावे करणार उघड

Nagpur NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात दीपावली मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. यात एका महिलेने सादर केलेली लावणी चर्चेचा विषय झाली आहे.
NCP Nagpur party office Lavni
NCP Nagpur party office Lavni Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यालयात झालेल्या लावणीच्या कार्यक्रमामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तो लावणीचा नव्हे तर कार्यकर्त्यांसाठी दीपावली मिलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होता असा दावा केला जात आहे. मात्र, कोणीतरी आमच्याच पक्षातील पक्षांतर्गत विरोधक आमची बदनामी करीत आहेत.

अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिमा मलिन करण्यासाठी कोणीतरी सुपारी घेतली असून त्यांची नावे लवकरच आपण उघड करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुनीता येरणे यांनी दिला. यावेळी त्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम सोडून लावणीचा एकच व्हीडीओ दाखवून महिलांची बदनामी केली जात असल्याचा आरोपही प्रसिद्धी माध्यमांवर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात दीपावली मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. यात एका महिलेने सादर केलेली लावणी चर्चेचा विषय झाली आहे. या लावणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच ट्रोल केले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनीसुद्धा निषेध केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याची दाखल घेऊन अहीरकर यांना सात दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्याची नोटीस धाडली आहे.

दरम्यान, अहीरकर यांच्या बचावासाठी महिला पधधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला ती लावणीच नव्हती असा दावा केला आहे. त्यानंतर आमची चूक झाली आहे. पक्ष कार्यालयात कार्यक्रम घ्यायला नको होता. मात्र आता झाले ते झाले कृपा करून महिलांची आणि आमच्या पक्षाची बदनामी करू नका अशी विनंती केली.

NCP Nagpur party office Lavni
Shirol Sugarcane Protest : कोल्हापुरातील शिरोळमध्ये ऊसाचं आंदोलन पेटलं, आमदाराच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवलं

नागपूर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहे. हे लक्षात घेऊन कोणीतर मुद्दामच राष्ट्रवादी आणि अजित दादांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात काही आमच्या पक्षाची मंडळी असल्याची शंकाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दीपावली मिलन कार्यक्रमात लावणी करणाऱ्या महिलेने आमच्या पक्षात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासह इतर महिलांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपली कला सादर केली. त्यात लावणीचाही समावेश होता. पक्षाच्या व्यतिरिक्त येथे कोणालाही बोलावण्यात आले नव्हते. यावरून लावणीचा व्हिडीओ आमच्यापैकीच कोणीतर व्हायरल केला केला हे स्पष्ट होते.

NCP Nagpur party office Lavni
Phaltan Doctor Death Case: फलटण डॉक्टर महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; मृत्यू नेमका कशामुळं झाला यावर झालं शिक्कामोर्तब

ज्याने कोणी ही सुपारी घेऊन पक्षाच्या बदनामीसाठी व्हीडीओ व्हायरल केला त्याचे नाव लवकरच समोर आणू असा इशारा येरणे यांनी दिला. मात्र त्यांनी यावेळी कोणावर शंका आहे हे सांगण्यास नकार दिला. लावणी सुरू असताना दादा देण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी शिट्या व टाळ्या वाजवल्या. त्याच काही गैर नाही. हा कार्यक्रम संपूर्ण कौटुंबिक होता असेही सुनीता येरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com