Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap News : पोलिसांच्या विनंतीनंतर आमदार जगतापांचे उपोषण स्थगित, काय घडलं नेमकं?

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग त्रस्त होता. आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील वाढत्या चोरींच्या घटनेवरून पोलिस यंत्रणेच्या कारभारावर खापर फोडले होते. मात्र, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर आमदार जगतापांनी उपोषण स्थगित केले.

नगर शहरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. व्यापाऱ्यांना टार्गेट करत चोरी केली जात आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या वाढत्या चोरींच्या घटनेवर पोलिस यंत्रणेला फैलावर घेतले होते. विशेष करून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटीचे प्रकार वाढल्याने त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला होता.

यावर आमदार जगताप यांनी रोष व्यक्त केला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेत आमदार जगताप यांनी नगर शहरात वाढत्या चोरी आणि लुटीवर पोलिसांनी वचक निर्माण न केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता.

आमदार जगताप आज मंगळवारी उपोषणाला बसणार होते. मात्र व्यापारी, आमदार आणि पोलिस अधिकारी यांची बैठक झाली आणि यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी आमदार जगतापांना उपोषण न करण्याची विनंती केली.

कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, सतीश मैड, कमलेश भंडारी, गोपाळ मणियार, अजिंक्य बोरकर, विश्वनाथ कासट, शांतीलाल गांधी, सुशील भळगट, हिरालाल चोपडा, अजित भंडारी,सतीश गुंदेचा, शैलेश गांधी बैठकीला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या आणि लुटीच्या घटनांचा विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे. नाकाबंदी, विना आणि फॅन्सी क्रमांक असलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा माग काढण्याची कार्यवाही सुरू आहे. काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. ( Ahmednagar Politics News )

नगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. त्या तुलनेत पोलिसांचे बळ कमी आहे. पोलिस अधीक्षकांनी 550 जागा भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पोलिस बळ वाढले की, यंत्रणेला अधिक गती मिळणार आहे. नगर शहर पोलिस दलामार्फत गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचीदेखील माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT