Ahmednagar News : बहुजन समाज पक्षाने राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रणशिंग फुंकले आहे. बसपचा बुधवारी (ता.29) छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मेळावा होत आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडू जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातदेखील झालेल्या आढावा बैठकीत पक्षाकडून घराणेशाही, भ्रष्टाचार आणि जातीयवादी पक्षांविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी केले.
नगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर येथे उद्या बुधवारी होत असलेल्या पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीदेखील करण्यात आली. जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शहराध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे,अन्वर शेख उपस्थित होते.
बसप (Bahujan Samaj Party) च्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पक्षात कामाला संधी असल्याचे सांगून बसपचा घराणेशाही, भ्रष्टाचार व जातीयवादी पक्षांविरोधात लढा असल्याचे काळूराम चौधरी यांनी सांगितले. आंबेडकरी विचाराने पक्षाचे कार्य सुरू असून, सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. पक्षाचे विचार व ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्यकर्त्यांनी काम करावे.
छत्रपती संभाजीनगर येथे उद्या बुधवारी होणाऱ्या पक्षाच्या मेळावा होत आहे. बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांची छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) येथे सभा होईल. नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चौधरी यांनी या वेळी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुनील ओव्हळ यांनी बसपचे नेहमीच जातीयवादी व भ्रष्टाचारी पक्षांविरोध लढा दिला आहे. येत्या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देणार असल्याचा इशारा दिला. उमाशंकर यादव यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार व जातीयवादाने देश पोखरला जात आहे.
शेतकरी(Farmer), युवक व कामगारांच्या प्रश्नापेक्षा जातीयवादी मुद्दे उपस्थित करून सर्व प्रश्नांना बगल दिली जात आहे. मात्र, बसपा जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता, समाजातील प्रश्न जनतेपुढे घेऊन जाऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नगर शहरातील बसपच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नगर शहर प्रभारीपदी शहानवाज मेहबूब शेख, विधानसभा कोशाध्यक्षपदी बाळासाहेब काते, शहर कोशाध्यक्षपदी सचिन उत्तम जाधव, विधानसभा सचिवपदी अमिर अन्वर खान यांची नियुक्ती करण्यात आली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.