Sharad Pawar, Sanjay Pawar & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय पवार शरद पवारांसमोरच व्यासपीठावर रडले!

मु. ग. पवार यांच्या पुतळ्याचे शरद पवार यांनी अनावरण केले.

Sampat Devgire

जळगाव : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते शुक्रवारी लोकनेते मु. ग. पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी मु. ग. पवार यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे (DCC Bank) संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांना प्रास्तविक करताना विविध आठवणी सागत शरद पवार यांच्यासमोर व्यासपीठावरच रडू कोसळले.

चांदसर (ता. धरणगाव) येथे माजी आमदार मु. ग. पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे, आमदार चिमणराव पाटील यांसह विविध नेते उपस्थित होते.

जिल्हा बँक संचालक संजय पवार यांनी प्रास्ताविक करून मनोगत व्यक्त केले. त्यांनी वडील मु. ग. पवार व शरद पवार यांच्या आठवणी सांगितल्या. देशाचे नेते शरद पवार हे मु. ग. पवार यांच्या संबंधामुळे चांदसर या गावी पुतळा अनावरण करण्यासाठी आले. यातच आपण धन्य झालो. आपल्याला कोणतेही पद नको आहे, परंतु शरद पवार यांनी असाच आशिर्वाद आमच्यावर ठेवावा, असे म्हणत संजय पवार व्यासपीठावर रडले व आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांचे थोरले बंधू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समन्वयक विकास पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

वसाका सुरु करण्याचे प्रयत्न

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले, की माजी आमदार मु. ग. पवार यांनी शेतकरी आणि शेतीप्रश्‍नासाठी सतत संघर्ष केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण राजकीय धडे घेतले. त्यांनी वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. आज हा कारखाना बंद आहे. मात्र हा कारखाना आजही सुरू होवू शकतो, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उघडून हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT