Sanjay Raut Shiv Sena UBT Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Shiv Sena UBT : नवहिंदुत्ववादी कसे जिंकतात, जनतेला सगळं माहिती; खासदार राऊतांचा आमदार जगतापांचा टोला

Ahilyanagar, ShivSenaUBT MP Sanjay Raut targets BJP and local claiming ShivSena remains district original and deeply rooted political Force : राहात्यातील शिर्डी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊतांचा महायुतीमधील स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : अहिल्यानगर शहराचे आमदार निवडून येण्यासाठी कोणकोणते राजकीय डावपेच खेळतात, अचानक हिंदुत्वाचा झेंडा कसा हाती घेतला जातो, हे इथला जनतेला चांगलेच ठाऊक आहे.

मात्र या भागातील मूळ आणि जनमानसात रुजलेला पक्ष शिवसेनाच आहे, असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना नेते खासदार संजय राऊत यांनी नवहिंदुत्ववाद्यांवरून जोरदार टीका केली. खासदार राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील या मुद्यांची माहिती महानगरप्रमुख किरण काळे यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी शिर्डी (Shirdi) इथं आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना भाजप आणि स्थानिक राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, महानगरप्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी अन् राजेंद्र दळवी उपस्थित होते. त्यापूर्वी राऊत यांनी शहरातील शिवसेना संघटनेचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

निवडणूक हरली म्हणजे पक्ष संपला किंवा कमकुवत झाला असे होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या (Shivsena) बाबतीत तर अजिबात नाही. महाराष्ट्रातील सर्वांत जुना आणि जनाधार असलेला पक्ष शिवसेना आहे. पुढील अडीच वर्षे कोणतीही निवडणूक नसल्याने हा संपूर्ण काळ आम्ही संघटनबांधणीसाठी वापरणार आहोत, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कालपासून जिल्ह्यात फिरत आहे. लोकांना भेटलो, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येकजण नव्या जोमाने कामाला लागला आहे. या जिल्ह्यात स्वतःला मोठे नेते समजणारे अनेक जण मूळचे काँग्रेसचेच आहेत. आता आपापल्या संस्था आणि राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांनी भाजपचा आश्रय घेतला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

खासदार राऊत यांनी या वेळी विरोधकांच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती, तेव्हा हेच लोक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी बसत होते. अशा लोकांना विचारधारा किंवा पक्षनिष्ठा नसते. जिथे सत्ता दिसते तिकडे ते जातात. आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत म्हणून ते भाजपमध्ये आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

उद्या महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सत्तेत आले, तर हेच लोक आमच्या दाराबाहेर रांग लावून उभे राहतील, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT