Sanjay Raut News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेला कुरुलकर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकतो. त्यावेळी भाजप सरकार एसआयटी नेमत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोचले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकले असून, भाजप व संघाशी सर्व संबंधित आहेत. या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोल्यात दंगली घडविल्या जात आहेत, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. (State Government had a conspiracy to create a riots to divert attention from Kurulkar case)
शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला की, महाराष्ट्र (Maharashtra) एकसंघ आहे, एकसंघ राहिल. तुम्ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या व गंभीर प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य शासनाने खरे तर कुरुलकर प्रकरणात एसआयटी नेमली पाहिजे; परंतू ते त्र्यंबकेश्वर प्रकरणात चौकशी समिती नेमत आहेत. कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर घटनेवर एसआयटी कसली नेमताय? रामनवमीनंतर दंगल झाली तेव्हा एसआयटी नेमली का? गेल्या साठ वर्षात रामनवमीला कधी दंगली झाल्या नाहीत. त्या यंदाच्या रामनवमीला झाल्या.
महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राहायला हवा. दंगली घडवून राजकारण करायचं असेल, तर ते कधी होणार नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. कुणीही बळजबरी घुसलं नाही. शंभर वर्षांपासून मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा योजनाबद्ध पद्धतीने बिघडविण्याचे खेळ सुरु आहेत. जनतेचा पाठिंबा नसल्याने सरकारकडून दंगली घडविल्या जात आहेत. महाराष्ट्रात हिंदुत्त्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडविण्याचा कट दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर मंदीरात यापुर्वी कोणीही घुसल्याची माहिती नाही. त्र्यंबकेश्वर आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र लिहायला सांगितले असल्याचेही राऊत म्हणाले.
दर्ग्यावर संघाचे लोक
मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जाण्याची परंपरा आहे. त्यानुसारच हे झालंय. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. अजमेर शरीफ, माहिम, हाजीअलीच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदू जातात. त्यात संघाचेही लोक असतात. तिथे पोलिसांकडूनही चादर चढविली जाते. हा श्रद्धेचा विषय आहे, असेही खासदार राऊत या वेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.