Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News : जळगावात राऊतांची तोफ धडाडली ; '' अरे...ते चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली का ?''

Deepak Kulkarni

Jalgaon : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांच्या सभांचा जोरदार धडाका लावला आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी घेतली आहे. बंडखोरीची झळा सोसलेल्या ठाकरे आणि पवारांनी आता आगामी लोकसभा आणि विधानसभा य़ा निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. बंडखोरांना बंदोबस्त करतानाच भाजपलाही रोखायचा चंग ठाकरे व पवारांनी बांधला आहे.

याचदरम्यान, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगावात वचनपूर्ती सभा नुकतीच पार पडली. या सभेत ठाकरे गटाची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. या वेळी त्यांनी आजच्या या सभेने 'त्या' चार टकल्यांना धडकी भरली असेल. उद्यापासून ते बाहेर पडणार नाहीत असा हल्लाबोल केला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी ( ता. १०) जळगावात वचनपूर्ती सभा झाली. या सभेला खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित आहेत. या सभेत शिवसेनेचे खासदार राऊत यांनी जळगावातील बंडखोर शिवसेना आमदारांसह भाजपवर सडकून टीका केली. या सभेत राऊतांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) त्याचबरोबर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांवर अप्रत्यक्ष टोला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आम्ही इथे येऊ नये, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचं अनावरण हे देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण आम्ही आलो, उद्धवजी आले, त्यांचं भव्य स्वागत झालं, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं. हजारोंच्या संख्येने इथे लोक जमले आहेत. आजच्या या सभेने त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल, असा टोलाही राऊतांनी लगावला.

''...ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का?''

संजय राऊतांनी जळगावातील सभेत स्थानिक आमदारांवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, अनेकांना आजच्या सभेची चिंता वाटत होती. या सभेला गर्दी होईल की नाही, याची काहींना काळजी वाटत होती. कारण काही लोक सारखं सारखं म्हणायचे की, जळगावची शिवसेना गेली, जळगावातली शिवसेना संपली, अरे चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली का? ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? खरी शिवसेना ही आपल्यासमोर या गर्दीत आहे. ही पाहा संपूर्ण जळगावातली शिवसेना असं आव्हानही विरोधकांना दिले.

''...म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली!''

संजय राऊत म्हणाले, आम्ही इथे येऊ नये, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचं अनावरण हे देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण आम्ही आलो, उद्धवजी आले, त्यांचं भव्य स्वागत झालं, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं. हजारोंच्या संख्येने इथे लोक जमले आहेत. आजच्या या सभेने त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल. उद्यापासून ते बाहेर पडणार नाहीत असा हल्लाबोलही राऊतांनी या वेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT