Maharashtra Political News : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीस टाळाटाळ करत असल्या आरोप ठाकरे गटाकडून केला जातोयं. (Shivsena News) ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याच मुद्यावरून नार्वेकर यांना टोला लगावला आहे.
दहीहंडीच्या एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे काॅलर उडवून नाचतांनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायलर झाला होता. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्षांना नाचायला वेळ आहे, पण आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यायला नाही, अशी टीका केली आहे.
राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना थेट विधानसभा अध्यक्षांवरच निशाणा साधला. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. (Maharashtra) इतके दिवस सुनावणी लांबवण्याची गरज नाही. कालच मी व्हिडीओ पाहिला दहीहंडीच्या एका मंचावर विधानसभा अध्यक्ष कॉलर उडवून नाचत होते. ही चांगली गोष्ट आहे.
पण तुम्ही सुनावणी करा, आम्ही सुद्धा तुमच्या सन्मानासाठी नाचू. हिंमत असेल तर कायद्याचं पालन करा. तुम्हाला नाचायला वेळ आहे, परंतू आमदारांच्या फैसल्या संदर्भात तुम्हाला वेळ नाही, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणी होणार असल्याची चर्चा आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची आणि ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार असल्याचे समजते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.