Sanjay Raut on Raj Thackrey: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी बँकांतील मराठी भाषेच्या आग्रहासाठी आंदोलन जाहीर केले होते. हे आंदोलन सुरू होण्याआधीच मागे घेण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मनसेचा हा कमकुवत दुवा नेमका हेरला आहे. या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचले आहे. राज ठाकरे यांनी आंदोलन मागे घेतल्याने संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.
राज ठाकरे महाराष्ट्रातील बँकांविरोधात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात आंदोलन करणार होते. गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर त्यांनीही घोषणा केली होती. त्यानुसार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सर्व तयारी देखील केली होती. मात्र आंदोलनाच्या आदल्या दिवशी ते मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संदर्भात खासदार राऊत यांनी मनसेच्या या यू टर्न बाबत राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली, अशा शब्दात त्यांना हिणवले आहे. आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत. राज ठाकरे यांच्या परंपरा काय आहेत, हे मी सांगायला पाहिजे का? असा प्रश्नही त्यांनी केला.
मनसेने मराठी भाषेच्या आग्रहासाठी कर्मचाऱ्यांच्या कानफटात मारली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. शिपाई किंवा वॉचमन ला मारून काय होणार आहे. तो धोरण ठरवतो का?, असा प्रश्न त्यांनी केला.
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा काढला होता. त्यात कुणाच्या कानफटात मारली होती, हे दाखवले आहे. शिपायाला नव्हे तर एअर इंडियाच्या चेअरमनला आम्ही कानशिलात लगावली होती. त्याचा काय परिणाम व्हायचा तो झाला. मराठी मुलांना एअर इंडियासह विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये भरतीचा मार्ग मोकळा झाला.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.