
Sanjay Raut political statements : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खादार संजय राऊत आज(शनिवार) नाशिक येथे होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेविषयी सुरू केलेल्या मनसे स्टाईल आंदोलनावरून टोला लगावला. ''मराठी भाषेविषयीचे आंदोलन शिपायाला कानफडात मारून होत नाही. त्यासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या अन् धोरणकर्त्यांच्या कानाखाली आवाज काढावा लागतो.'' असं संजय राऊत म्हणाले.
याशिवाय, पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयातील गैरप्रकारांच्या विरोधात विविध आंदोलने सुरू आहेत. तर आंदोलकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्रीवर उपचार झाले नाही आणि नंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. जवळपास 20 संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयाबाहेर आंदोलन केले आहे. अद्यापही त्याविषयीचा संताप दिसत आहे.
या घटनेवरून सुरू असलेल्या विविध आंदोलनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, पण शोबाजी करणे थांबवले पाहिजे असे म्हटले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ''महाराष्ट्रात अनेक प्रकारचे आंदोलने झाली. फडणवीस यांनी कोणतेही आंदोलन केलेले नाही. ते फक्त महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी आले आहेत.''
तसेच ''या राज्याचे नेतृत्व अनेक प्रतिष्ठित आणि नामांकित नेत्यांनी केले आहे. त्यांचा एक वैचारिक दर्जा होता. त्यांना एक सांस्कृतिक स्तर होता. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, मनोहर जोशी या नेत्यांना एक स्तर होता. मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणताही स्तर नाही, फडणवीस यांना ती लेव्हल कधीच प्राप्त करता येणार नाही, ते भंपक आहेत.'', अशा शब्दांत संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
याचबरोबर ''मंगेशकर रुग्णालयात सर्व आरएसएसची(RSS) मंडळी काम करीत आहे. त्यावर निर्णय घेणारे देखील त्यांचे समर्थक आहेत. सर्व भाजपची मंडळी असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई सरकार करणार नाही. त्यामुळेच जनतेतील क्षोभ आणि होणारे आंदोलन याविषयी मुख्यमंत्री आंदोलकांना 'शो' करतात असे म्हणू शकतात. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.'' असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.
''हॉस्पिटलच्या टेरेसवरून जाऊन आंदोलन सुरू असून असले प्रकार करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणाची सरकारने दखल घेतली असून जी काही योग्य कायदेशीर कारवाई असेल, ती करण्यात येईल. मात्र शो बाजी करणे बंद झाले पाहिजे. भाजप(BJP) महिला आघाडीकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली हे चुकीचे आहे. ती महिला आघाडी भाजपची असो वा इतर कोणत्याही पक्षाची अशा प्रकारे तोडफोड करणे अत्यंत चुकीचे आहे.'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.