Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत म्हणतात, "हा तर अदानींचा अपमान"

Sanjay Raut; Shivsena UBT leader Raut not agree with election result-औषध व अन्न प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली.

Sampat Devgire

Sanjay Raut News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा वाद अद्यापही सुरूच आहे.

खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक शंका आहेत. त्या निवडणूक आयोगाकडे मांडल्या आहेत. मात्र निवडणूक आयोग त्यावर पारदर्शीपणे काहीही सांगण्यास तयार नाही.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा निकाल, मतदानाची आकडेवारी आणि मतदार यादीतील वाढलेले नवे मतदार याबाबत सप्रमाण निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. त्यामध्ये अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. मात्र निवडणूक आयोग त्यावर काहीही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आम्हाला आजही मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, देशात राज्यघटना अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत विविध उमेदवारांनी देखील न्यायालयात याचिका केल्या आहेत.

खासदार राऊत म्हणाले, राज्यघटनेबाबत केंद्रातील सरकार अतिशय जाणीवपूर्वक वेगळी भूमिका घेत आहे. न्याय, समता, बंधुता हे सर्व शब्द केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणातच शिल्लक आहेत. वास्तवात त्यातले काहीच दिसत नाही. म्हणूनच संविधान अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो.

सध्या राज्यात सत्तेत असलेली मंडळी कसा कारभार करीत आहे, हे रोज जनतेपुढे येत आहे. सामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बिनडोक लोकांच्या हाती सत्ता गेल्यामुळे जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नंदुरबारचे पालकमंत्री पद मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मी गरीब असल्याने नंदुरबार सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आल्याचे विधान त्यांनी केले होते. त्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खूपसून गद्दारी केलेला नेता गरीब कसा असू शकतो. अशा नेत्याला गरीब म्हणणे म्हणजे, उद्योगपती अदानी यांचा अपमान केल्यासारखे होईल, या शब्दात त्यांनी मंत्री झिरवाळ यांची खिल्ली उडवली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT