Chhagan Bhujbal Politics : अमित शाहांच्या जवळून उठल्यानंतर भुजबळांनी भूमिका केली स्पष्ट, म्हणाले...

Chhagan Bhujbal; Bhujbal express that he unhappy with NCP again-माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपण नाराज असल्याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: माजी मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी मालेगाव येथे भाजप नेते अमित शहा यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी व्यासपीठावर श्री शहा यांच्याशी चर्चा देखील केली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

मालेगाव येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम संपला. त्यानंतर माजी मंत्री भुजबळ नाशिककडे रवाना झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Chhagan Bhujbal
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंना झालंय तरी काय...? तीन दिवसांचा दौरा अवघ्या एकाच दिवसांत गुंडाळला...!

यावेळी आपण भारतीय जनता पक्षात जाणार का? या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले. माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले सध्या तरी मला राज्यातच राहण्यात रस आहे. दिल्लीत जाण्याची कोणतीही इच्छा नाही. सध्या तरी आपण महाराष्ट्रातच सक्रीय राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Ajit Pawar Politics: अजित दादा, नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलेला 'वादा' विसरले काय?

भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, या बातमीत काहीही तथ्य नाही. तो माझा मार्ग नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमित शहा आणि भाजप यांच्याशी भुजबळ यांची जवळीक हा तत्कालीन राजकीय विषय म्हणूनच त्याकडे पाहिले जाते.

श्री भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला दिल्लीत जाण्याची इच्छा होती. त्याबाबत मी माझे मत स्पष्टपणे मांडले देखील होते. राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यामुळे मला मिळणार होती.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी जुळून आल्या नाही. त्यामुळे मला निर्णय बदलावा लागला. राज्यसभेवरील नियुक्तीच्या वेळी देखील भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र तसे काहीही घडले नाही.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्री भुजबळ यांना येवला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी माझी राज्यात गरज आहे. त्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीत सक्रिय व्हावे, असे पक्ष नेतृत्वाने सांगितले होते, असे भुजबळ म्हणाले.

एकंदरच मालेगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात माजी मंत्री भुजबळ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपचे विविध नेते देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी भुजबळ यांच्याशी संवाद केला.

भुजबळ यांना अमित शहा यांनी आपल्या जवळच्या आसनावर बसविले. त्यामुळे उपस्थितांत आणि जिल्ह्यात भुजबळ आणि भाजप यांच्या विषयी एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. तिला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र भुजबळ यांची नाराजी दूर झालेली नाही हे देखील स्पष्ट झाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com