Devendra Fadanvis & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी उलगडले 'ते' रहस्य, फडणवीसांची केली स्तुती तर भाजप नेतृत्वावर टिका!

Sanjay Raut;Raut kills two birds with one stone, praises Devendra Fadnavis-संजय राऊत यांनी शिवसेना भाजप युती तुटण्यामागे घडलेले राजकारण उघड केले.

Sampat Devgire

Sanjay Raut News: शिवसेना भाजप युती २०१४ मध्ये तुटली. त्यावरून भाजप आणि शिवसेनेत सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आले आहेत. मात्र याबाबतचे एक मोठे रहस्य राऊत यांनी उघड केले आहे. त्यात त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजप युती संदर्भात जागा वाटपाची चर्चा २०१४ मध्ये झाली. यावेळी एका एका जागेसाठी ७२- ७२ तास चर्चा सुरू असायची. भाजपचे नेते ओम माथुर हे सर्व अगदी जवळून पहात होते. चर्चेचा हा घोळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावरून झाला. हा अजेंडा दिल्लीत आधीच ठरला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी चर्चेत सहभागी असत. शिवसेना-भाजप युती कायम राहावी, ही त्यांची मनापासून इच्छा होती. या शब्दात त्यांनी फडणवीस यांची स्तुती केली. मात्र त्याचवेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांनी दगडात दोन पक्षी मारले आहे.

तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शिवसेना संपवायची होती. त्यासाठी चर्चेचे फक्त नाटक, करायचे होते. त्यानंतर चर्चेत योग्य निष्कर्ष निघत नसल्याने युती तुटल्याचे त्यांना जाहीर करायचे होते. हे सर्व उघड झाले असून त्यात काहीही लपून राहिलेले नाही.

तेव्हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या हिंदी पट्ट्यातील चार राज्यात शिवसेनेला ६० ते ६५ लोकसभेच्या जागा लढवायच्या होत्या. त्यात तीस ते चाळीस खासदार शिवसेनेचे विजयी झाले असते. मात्र पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मत विभागणी टाळावी यासाठी दूरध्वनी केला होता. त्याचा आदर ठेवून शिवसेनेने निर्णय स्थगित केला. असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

यावेळी राऊत यांनी "मोठ्या दंगली घडविणारे मास्टरमाईंड नेहमीच सरकार मध्येच असतात" असा खळबळ जनक दावा केला. नागपूरची दंगल घडविणारे मंत्रिमंडळातच असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर दंगल प्रकरणी फईम खान याच्यावर कारवाई झाली. मग दंगलीची ठिणगी टाकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT