Satyajeet Tambe And Amol Khatale : 'छत्रपतीं'ची किमया! कट्टर विरोधक सत्यजीत तांबे अन् अमोल खताळ एकत्र

Satyajeet Tambe Amol Khatale Transport Minister Pratap Sarnaik Chhatrapati Shivaji Maharaj Sangamner : संगमनेर इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ एकत्र आले होते.
Satyajeet Tambe And Amol Khatale
Satyajeet Tambe And Amol Khatale Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner Shivaji Maharaj Statue : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी', म्हणताच संपूर्ण महाराष्ट्र एक होतो. कोणत्याही जाती-धर्माचा असू देत, हा जय जयकार सुरू होताच, आपसूक एक होतो.

स्वराज्याची बांधणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी संगमनेरमधील कट्टर राजकीय विरोधक मुंबईत एकत्र आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे एकत्र आल्याने अनेक राजकीय धुरींच्या भुवया उंचवल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अमोल खताळ यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पाठबळावर सत्ता परिवर्तन घडवले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडील संगमनेरचे नेतृत्व काढून घेत अमोल खताळ यांनी विधानसभेत झेप घेतली.

Satyajeet Tambe And Amol Khatale
Sujay Vikhe And Ram Shinde : लोकसभेला आव्हान दिलेल्या राम शिंदेंचा 'तो' सल्ला सुजय विखेंना रूचणार का?

बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) यानंतर न थांबता मैदानात कायम राहून, संगमनेरचा आपला आमदार म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे हेच आपले आमदार आहेत, असे सांगून टाकले. यानंतर आमदार तांबे संगमनेर मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची हजेरी असते. याशिवाय थोरातांनी देखील मतदारसंघाच्या बांधणीवर लक्ष ठेवून आहेत.

Satyajeet Tambe And Amol Khatale
Raghunath Dada Patil : शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीला जाणार? रघुनाथ पाटलांनी महायुती सरकारसह बँकांना भरला दम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने थोरात-खताळ यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. थोरातांच्याबरोबर आमदार तांबे स्वतः मैदानात होते. यामुळे प्रशासनच तणावाखाली आले होते. याच 'छत्रपतीं'मुळे आमदार तांबे आणि आमदार खताळ हे मुंबईत एकत्र आले होते.

आमदार तांबे अन् आमदार खताळ एकत्र

संगमनेर इथल्या बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्र लिहिले होते. छत्रपतींचे स्मारक भव्य व्हावे, अतिरीक्त जागा मिळावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मुंबईत आमदार तांबे आणि आमदार खताळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनिमित्ताने दोन कट्टर विरोधक मुंबईत एकत्र आल्याने संगमनेरमधील दोन्ही नेत्यांकडील स्थानिक पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले होते. मंत्री सरनाईक यांनी दोन्ही आमदारांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com