PM Narendra Modi & Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire Politics: पंतप्रधान मोदींच्या सभेने सरोज अहिरे यांच्या महायुतीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

Saroj Ahire; MLA Ahire candidate of mahayuti in devlali confirm-महायुतीच्या उमेदवार कोण, याबाबतचा संभ्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने झाला दूर

Sampat Devgire

Ajith Pawar News: देवळाली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे उमेदवार आहेत. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने याविषयी वेगळाच गोंधळ निर्माण केला होता. तो आता दूर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या प्रचारासाठी नाशिक येथे सभा झाली. या सभेच्या व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे देखील होत्या.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावर आमदार सरोज अहिरे यांना स्थान मिळाले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार कोण? याचे संकेत मतदारांना गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांची सभा यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

महायुतीचे घटक पक्ष भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह अन्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे यांच्या प्रचारात भाग घेतला आहे. महायुतीने देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असल्याने अजित पवार यांना सोडला होता. त्यांनी आमदार अहिरे यांना उमेदवारी जाहीर केली.

आमदार अहिरे यांच्या प्रचाराची सुरुवात देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी सय्यद पिंपरी येथून केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे पक्षाने देवळालीतून राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माघारीच्या दिवशी श्रीमती अहिरराव यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या दिवसभर नॉट रिचेबल होत्या.

देवळाली मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यात शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी जोपर्यंत पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री शिंदे सूचना करीत नाहीत, तोपर्यंत कोणाचाही प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण? याचा निर्णय होणे अपेक्षित होते.

या वादावर शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी अद्याप मौन सोडलेले नाही. श्रीमती अहिरराव यांनी देखील मतदार संघात प्रचार सुरू केला आहे. आपणच महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहोत, असा त्यांचा दावा होता.

त्यामुळे कार्यकर्त्यांत देखील संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. तो संभ्रम आता दुर झाला आहे. मात्र महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा शुक्रवारी झाली. या सभेच्या नियोजनासाठी आमदार अहिरे आणि त्यांच्या समर्थकांनी विशेष प्रयत्न केले.

सभेसाठी आमदार अहिरे यांनी आपले योगदान देखील दिले. त्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. मोदी यांच्या सभेत महायुतीच्या उमेदवारांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. श्रीमती अहिरराव यांना मात्र या सभेचे निमंत्रण नव्हते. त्यामुळे अहिरराव या सभेपासून लांबच राहिल्या.

महायुतीचा उमेदवार कोण? याचा संभ्रम आता दूर झाला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्रीमती अहिरे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. श्रीमती अहिरराव या मात्र आपल्या निवडक समर्थकांचे मतदार संघात दौरे करीत आहेत. महायुतीतील या गोंधळाचा लाभ महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार योगेश घोलप यांना होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT