MLA Saroj Ahire, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire : काल गिरीश महाजनांनी कान टोचले, आज आमदार सरोज अहिरेंची दुसरी फेसबुक पोस्ट; CM फडणवीसांचं नाव घेत काय म्हणाल्या?

MLA Saroj Ahire thanks Chief Minister Devendra Fadnavis : आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मतदारसंघातील लोडशेडींगविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला होता.

लोडशेडींगमुळे आपल्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या याच संभाषणाचे रेकॉर्डिंग आमदार सरोज अहिरे यांनी फेसबुकवर पोस्ट केलं. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन त्याची चर्चा झाली. ज्यावरुन मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सरोज अहिरे यांचे कान टोचले. महाजन यांनी सरोज अहिरे यांना समज दिली.

महाजन म्हणाले, अशाप्रकारे संभाषण रेकॉर्ड करुन लोकांना ऐकवणे योग्य नाही. आपण लोक प्रतिनिधी आहोत, आपल्याला या गोष्टीची समज असणे गरजेचे आहे. तुमची काय समस्या असेल ती मांडा, निवेदन द्या, फोटो काढा. परंतु अशाप्रकारे मुख्यमंत्री तुमच्यासोबत मोबाईलवर बोलताय आणि तुम्ही ते स्पीकरवर टाकून किंवा रेकॉर्डकरुन लोकांना ऐकवत असाल तर ते योग्य नाही. अशा शब्दांत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे जाहीर कान टोचले.

दरम्यान, आमदार सरोज अहिरे यांनी सरकारनामाशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, शेतकरी बांधव लोडशेडींगमुळे त्रस्त झाले होते. आख्खा तालुका अंधारात होता. गेल्या आठ दिवसांपासून मी प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांना भेटत आहे, बैठका घेत आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून प्रश्न न सुटल्याने शेवटी मला मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला. सकारात्मक बाब अशी की, काल पासून माझ्या तालुक्यातील लोडशेडींग बंद झालं. शेतकरी समाधानी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे असं सरोज अहिरे यांनी सांगतिलं.

थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, एक विश्वास मिळेल हाच माझा उद्देश होता. एका आमदाराचा असो वा एखाद्या सर्वसामन्य नागरिकाचा सुद्दा फोन मुख्यमंत्री उचलतात आणि तक्रारीची दखल घेऊन त्यावर कशापद्दीने तत्काळ कार्यवाही करतात ही सरकारची सकारात्मक बाजू मी मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आमदार सरोज अहिरे यांनी सांगितलं.

अहिरेंची दुसरी फेसबुक पोस्ट

महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी (देवाभाऊ) फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी म्हणुन माझ्या तक्रारीची तात्काळ दखल घेत शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे आज माझ्या तालुक्यात लोडशेडिंग झाली नाही. त्यामुळे अंधारात असलेल्या माझ्या शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

देवळाली मतदारसंघाच्या वतीने मा. मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे मनःपूर्वक आभार.. अशी फेसबुक पोस्ट आता आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT