Yogesh Gholap & Saroj Ahire Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Saroj Ahire Won: सरोज अहिरे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी, शिवसेनेचे योगेश घोलप तिसऱ्या स्थानी!

Devlali Assembly Constituency Result 2024: आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या विरोधकांना धुळ चारत राजश्री अहिरराव यांचा पराभव केला. शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप या पारंपरिक लढतीत ते तिसऱ्या स्थानी राहिले.

Sampat Devgire

Devilal News: देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी विरोधकांना धुळ चारली. त्या चाळीस हजार ४६३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी महायुतीच्या बंडखोर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे पक्षाच्या राजश्री अहिरराव यांचा पराभव केला.

देवळाली मतदारसंघात वीस फेऱ्या झाल्या. त्यात आमदार अहिरे यांना ८१ हजार २९७ मते मळाली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या राजश्री अहिरराव यांना चाळीस हजार ८३४ आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप तिसऱ्या स्थानावर राहील्या. त्यांना अडतीस हजार ७१० मते मिळाली.

देवळाली मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे योगेश घोलप यांच्यात सरळ सामना वाटत होता. मात्र माजी आमदार घोलप तिसऱ्या स्थानी गेले. यामध्ये शिवसेना शिंदे पक्षाने शेवटपर्यंत गोंधळाची भूमिका ठेवली. त्यामुळे राजश्री अहिरराव यांना त्यांनी उमेदवारीच नव्हे तर पडद्यामागून 'लक्ष्मी दर्शन' आणि अन्य पाठिंबा दिला.

या बळामुळे अहिरराव या किती मते घेतात यावर मुख्य उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडते की घडते हे ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ शिंदे हे देखील मतदारांचा कौल घेत होते. मात्र मतदारांनी आमदार अहिरे यांना कौल दिला आहे.

हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाचा गेली तीस वर्ष बालेकिल्ला आहे. 1990 ते 2019 यादरम्यान घोलप कुटुंबीय येथे प्रतिनिधित्व करीत आले आहे. 2019 ची निवडणूक त्याला अपवाद ठरली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी पक्षात फूट पडल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला मतदारांनी पसंती दिली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT