Santosh Deshmukh, Krishna Andhale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Krushna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी नाशिकमध्ये? कृष्णा आंधळेच्या 'त्या' फोटोमुळे एकच खळबळ

Sarpanch Santosh Deshmukh murder case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजित आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हत्येचा कट रचल्याचा आरोप करत वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Nashik News, 16 Jan : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हत्येचा कट रचल्याचा आरोप करत वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिवाय बुधवारी (ता.15) कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्यायाधीशांची चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे या हत्या प्रकरणातील एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. अशातच आता हा आरोपी नाशिकमध्ये (Nashik) असल्याच्या चर्चांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिराच्या भागात फिरत असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी लगेच सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासले.

रात्रभर पोलिसांनी (Police) या भागात सर्च ऑपरेश केल्यानंतर सोशल मीडियावर कृष्णा आंधळे म्हणून जे फोटो व्हायरल होत होते ते कृष्णा आंधळेचे फोटो नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. तसंच आंधळे नाशिकमध्ये असल्याच्या केवळ अफवा असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितलं. तसंच नागरिकांना खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील सपकाळे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT