Satyajeet Tambe | Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe : नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग, नेत्यांनी दाखवला रेड सिग्नल!

Nashik-Pune High Speed Railway Update : नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बदलाला नाशिकचे लोकप्रतिनिधी करणार विरोध

Sampat Devgire

Nashik News: नाशिक पुणे रेल्वे मार्गात बदल करण्यात येणार आहे यामध्ये शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. मात्र या बदलाच्या विरोधात नेत्यांनी लाल झेंडा फडकवला आहे.

या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर मार्गे पुणे असा प्रस्तावित होता. त्यात आता शिर्डी आणि अहिल्यानगर शहराचा समावेश केला जाणार आहे.

त्यामुळे हे अंतर ८० किलोमीटर वाढणार आहे. शिवाय प्रवासाचा कालावधी देखील एक तासाने वाढेल. त्यामुळे नाशिक ते पुणे अशी थेट रेल्वे करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल. त्यामुळे या मार्गात शिर्डी आणि अहिल्यानगरच्या समावेश करू नये अशी मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांच्याशी यासंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांची तीन वेळा चर्चा झाली. या कालावधीत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले होते. नाशिक ते पुणे हा थेट रेल्वे मार्ग अपेक्षित होता.

या रेल्वे मार्गातील ३० टक्के जमिनींचे संपादन देखील झाले आहे. आता अचानक त्यात बदल झाल्याने खासदार वाजे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुळ मार्गात बदल केल्यास अनेक अडचणी येतील. हायस्पीड रेल्वेचा मुळ उद्देश विफल होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात खासदार वाजे यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींना संघटित करून रेल्वेमंत्र्यांची पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले आहे. प्रस्तावित मार्गानेच ही रेल्वे करण्यात यावी नाशिकहून थेट पुण्याला जाण्यासाठी तीच सोयीचे आहे. त्यामुळे अन्य कोणताही बदल करू नये रेल्वेमंत्री देखील याबाबत सकारात्मक होते. त्यामुळे अचानक यात होऊ घातलेल्या बदलाला आम्ही विरोध करू, असा इशारा खासदार वाजे यांनी दिला आहे.

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र आता त्यात विविध बदल होऊ लागल्याने राजकारण शिरल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी ही यावर आक्रमक झाले आहेत. आगामी काळात या विषयावर आंदोलन अधिक प्रखर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वेत राजकारण देखील तेवढेच वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT