Nashik Industries Land issue News : नवीन उद्योग किंवा उद्योग विस्तारासाठी कारखान्यांना राज्यात जागा मिळत नाही; परंतु सिन्नरच्या गुळवंच परिसरात इंडियाबुल्स कंपनीला शासनाने जवळपास २६०० एकर जागा उद्योगासाठी दिली. यातील एक हजार एकर जागा वगळता उर्वरित दीड हजार एकर जागा पडून आहे. ती जागा इंडियाबुल्सकडून घेऊन मोठ्या उद्योगांना द्यावी, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. (MLC Satyajeet Tambe start follow-up for Indiabulls land)
पहिल्या टप्प्यात उद्योगमंत्र्यांशी (Indusries) संवाद साधून उद्योगांसाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. इंडियाबुल्सकडून (Indiabulls) ही जागा घेऊन नाशिकच्या (Nashik) उद्योगांना दिल्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चार लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होईल. माहिती तंत्रज्ञान किंवा वस्तुनिर्मिती कारखान्यांना प्रोत्साहन मिळेल, असा दावा आमदार तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला आहे.
नाशिकमध्ये क्रेडाईच्या पदग्रहणनिमित्त आलेल्या आमदार तांबे यांनी सिन्नर तालुक्यात इंडियाबुल्स कंपनीला दिलेल्या जागेचा मुद्दा उचलून धरला. या निमित्ताने उद्योगांसाठी दिलेली जवळपास दीड हजार एकर जागा विनावापर पडून असल्याचे नाशिककरांना समजले. इंडियाबुल्सला एक हजार ६०० एकर जागा वीजनिर्मितीसह अन्य कामासाठी शासनाने दिली.
यातील अकराशे एकर जागेवर रेल्वेलाइन, तसेच वीजनिर्मिती प्रकल्पाचे स्ट्रक्चर उभे करण्यात आले आहे. उर्वरित जवळपास दीड हजार एकर जागा विनावापर पडून आहे. राज्यात किंवा नाशिक जिल्ह्यात नवीन उद्योग किंवा उद्योग विस्तारासाठी नवीन जागा मिळत नाही. पांजरपोळ येथील जवळपास साडेसातशे एकर जागेवरून वाद-प्रतिवाद सुरू आहे. अशा परिस्थितीत विनावापर दीड हजार एकर जागा पडून असल्याच्या वृत्ताने उद्योगविश्वाचे लक्ष या प्रश्नाकडे केंद्रित झाले.
विकासासाठी अनुकूल स्थिती
दीड हजार एकर जागा इंडियाबुल्सकडून काढून घेऊन उद्योगांना दिल्यास ज्या उद्योगांना शंभर ते दोनशे एकरच्या प्लॉटची आवशक्यता आहे त्यांच्यासाठी उपयोगात येईल. माहिती व तंत्रज्ञान, तसेच वस्तुनिर्मिती उद्योग तेथे सुरू होतील. प्रत्यक्ष दोन लाख, तर अप्रत्यक्ष दोन ते अडीच लाख रोजगारनिर्मिती होईल. नाशिकच्या विकासाला चालना मिळेल. नाशिक व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील सिन्नर या औद्योगिक शहराचा विकास होईल. इंडियाबुल्सच्या जागेपासून तीन ते चार किलोमीटरवर गोंदे फाटा आहे.
येथून समृद्धी महामार्गावर चढ-उतार करण्यासाठी इंटरचेंज आहे. या सर्वांचा विचार करता दीड हजार एकर उद्योगांसह रोजगारनिर्मितीला फायदेशीर आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बैठक लावण्यात आल्याची माहिती आमदार तांबे यांनी दिली.
सरकार कोणत्याही प्रकल्पाला जागा देताना तो प्रकल्प ठराविक वेळेत सुरू करण्याची अट असते. त्यामुळे या प्रकरणात शर्तभंगदेखील झाला आहे. भूसंपादनासाठी प्रकल्पग्रस्तांना अनेक आश्वासने दिली होती, त्यांचीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे इंडियाबुल्स प्रकल्पाची जागा तातडीने एमआयडीसीने ताब्यात घ्यावी. सिन्नरच्या उद्योगांना विस्तारवाढीसाठी काही जागा सवलतीच्या दरात द्यावी. समृद्धी महामार्गामुळे या ठिकाणी मुंबईची कनेक्टिव्हिटी असून, समृद्धीपासून इंडियाबुल्सचे अंतर केवळ दोन ते तीन किलोमीटर आहे. त्याचबरोबर या ठिकाणाहून सुरत-चेन्नई हायवेचे काम सुरू आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू आहे, त्यामुळे हा प्रकल्प रोजगारनिर्मितीचे मोठे साधन ठरणार आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही सुरू करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.