Congress मधील सर्वात खराब अध्यक्ष कोण ? ; गुलाम नबी आझादांचा मोठा गौप्यस्फोट

Ghulam Nabi told former worst president of congress : गुलाम नबी आझाद त्यांच्या आत्मचरित्रामुळे सध्या चर्चेत आहेत
gulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi
gulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

Ghulam Nabi told former worst president of congress : माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi) सध्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. यात त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेसच्या कारर्कीदीचा लेखाजोखा त्यांनी मांडला.

काँग्रेसमधील अनेक राज त्यांनी उघड केले नसले, तरी जुन्या काँग्रेससोबत असलेले ऋणानुबंधाबाबत आझाद यांनी आदर व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेच्या दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमधील अनेक वादग्रस्त मुद्दांना स्पर्श केला आहे. लवकरच त्यांच्या 'आझाद" या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.

gulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi
SSC Paper Leak Case : भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक ; कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी रोखली ; video पाहा

या आत्मचरित्रात त्यांनी काँग्रेसबाबतच्या अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुक केले आहे. तर वादग्रस्त मुद्यांवरही गुलाम नबी आझाद यांनी ताशेरे ओढले आहेत. 'काँग्रेसमधील सर्वात खराब अध्यक्ष कोण? यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं आहे.

इंदिरा गांधीपासून ते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आझाद यांनी काम केले आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या चांगल्या आणि वाईट अनुभवाबाबात भाष्य करण्याचा त्यांना अधिकार आहे.

gulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi
Raju Shetty Big Announcement : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा ; दोन्ही सरकारला कंटाळलो..

राहुल गांधी यांनी काम करण्याची पद्धतीवर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्या मते पीव्ही नरसिंहराव हे चांगले पंतप्रधानमंत्री जरुर होते, पण १९९६च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नरसिंहरावच जबाबदार असल्याचा आरोप आझाद यांनी आत्मचरित्रात केला आहे.

गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की १९९६ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यांची चर्चा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत झाली. तेव्हा पक्षाचे नेतृत्व हे पीव्ही नरसिंहराव करीत होते. त्यावेळी आझाद यांनी नरसिंहराव यांच्यासमोरच सांगितले होते की ते चांगले पंतप्रधान आहेत, पण पक्षासाठी ते चांगले अध्यक्ष नाहीत.

gulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi
Thackeray Vs Fadnavis : 'फडतूस - काडतूस' वरुन अंधारे फडणवीसांना असं का म्हणाल्या, "..तुमच्या घरात एक बाई .."

पक्षाच्या संघटन कौशल्यासाठी नरसिंहराव यांच्याकडे वेळ नाही. त्यांना त्यात रस नव्हता, हेच एकमेव कारण होते की त्यावेळी लोकसभेची निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, असे आझाद यांनी लिहिलं आहे. त्यावेळी त्यांच्याविरोधात वर्किंग कमिटीमध्ये कोणीही बोलले नाही, असे आझाद यांनी नमूद केले आहे.

राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे पत्र आझाद यांनी सोनिया गांधींनी लिहिले होते. या पत्रावर २३ ज्येष्ठ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पण हे गांधी परिवारांने त्यांच्यासाठी आव्हान असल्याचे मानले. त्यामुळे २३ नेत्याविरुद्ध गांधी परिवार असा अंतर्गत संघर्ष सुरु झाला.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com