Shiv Sena : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जाहीर सभा पार पडली.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भर सभेतून ठणकावलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, ''स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. आपण एकत्र आलो आहोत. ते देशातील लोकशाही वाचवण्यासाठी. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापि सहन करणार नाही'', असा इशाराही त्यांनी दिला.
''स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 14 वर्ष छळ सोसला. सावरकरांनी 14 वर्ष मरण यातना सोसल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केलं ते कुणाचेही काम नाही. त्यामुळे आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आलो आहोत, लोकशाही टिकविण्यासाठी आपण लढत आहोत, त्याला फाटे फोडू नका'', असा सल्लाही राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांनी दिला.
''अनिल देशमुखांना ज्या वेळी जेलमध्ये टाकलं त्यावेळी त्यांच्या पाच वर्षाच्या नातीची देखील चौकशी केली. बिहारच्या लालूप्रसाद यादव यांची सून गर्भवती असतानाही तिची चौकशी केली. मग तेव्हा कुठं होतं तुमचं हिंदुत्व? महिलांचा आदर राखा'', असा सवाल त्यांनी केला.
''तुमचेच नेते सांगतात की आम्हाला आता शांत झोप लागते. तुमचेच आमदार सांगतात आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे, आमच्याकडे आलात की भष्ट्राचार धुवून स्वच्छ होतो'', अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.