Uddhav Thackeray : 'तुमची १५२ कुळे जरी आली तरीही शिवसेनेला ठाकरेंपासून वेगळे करु शकत नाही'

Uddhav Thackeray News : मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, त्यावर कृषीमंत्री म्हणतात, त्या होतच असतात. गारपीटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सत्ता गेल्याचे दु:ख नाही. गद्दारी करुन सरकार पाडले. खंडोजी खोपडेची ओलाद, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर केली.

उद्धव ठाकरे यांनी मालेगावमध्ये सभा घेतील, यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी ते म्हणाले, शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला. तुम्ही आईच्या कुशीवर वार केला, असाही टोला शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंनी लगावला. हिंमत असेल तर आज निवडणूक घ्या. तुम्ही मोदींच्या नावाने लढा, मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो, असा इशारा ठाकरे यांनी शिंदेंना आणि भाजपला दिला.

Uddhav Thackeray News
Sanjay Raut : मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाचे गांडुळ झाले आहे. आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा त्यांनी बघावी. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येने दिली, ती काय रद्दी होती काय, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना (Shivsena) माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही. गद्दारांना स्वत:च्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, असा टोला त्यांनी लगावला.

गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. पक्ष चोरला, चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता येणार नाही. मात्र, गद्दारीचा शिक्का कपाळावर मारुन घेतला, असे ठाकरे म्हणाले. ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे.

Uddhav Thackeray News
Mumbai : मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा; तर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या घरी; चर्चेला उधाण

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिंदे गटाला 48 जागाच देणार, तुमच्या नावा येवढ्या तरी जागा द्या. जर भाजपला वाटत असेल की ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करु शकतो. तर तुमचे ५२ काय १५२ कुळे घेऊन या, शिवसेनेला ठाकरेंपासून वेगळे करु शकत नाही. आता निवडणुका घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com