Nashik News : नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून भाजपचे मंत्री संकटमोचक गिरीश महाजन हे काम पाहत आहेत. पण त्यांच्या कामात आता अभिनेते सयाजी शिंदे आडवे आले आहेत.
कुंभमेळ्यानिमित्त देश- विदेशातील साधू- महंत नाशिक कुंभनगरीत येतील. त्यांच्यासाठी तपोवनात साधूग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी ५४ एकर जागा प्रशासनाला मोकळी करायची आहे. त्यामुळे या जागेवरील तब्बल १८०० जाडांवर मनपाने फुली मारली आहे. ही झाडे तोडण्यात येणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी त्याला विरोध केला आहे. मनसेने देखील या आंदोलनात उडी घेत झाडे तोडण्यास विरोध दर्शवला आहे.
निसर्गाचे संगोपन व्हायलाच पाहीजे पण, कुभमेळा हा १२ वर्षातून एकदा येतो. आपल्याकडे दुसरी जागा नाही. साधुग्रामसाठीच ही जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवरील काही वृक्ष तोडावेच लागतील अशी भूमिका कुंभमेळा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केली होती. तसेच तोडलेल्या एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल अशी ग्वाही महाजन यांनी दिली होती.
परंतु गिरीश महाजन यांच्या या भूमिकेवर सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रमुख व अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. कुंभमेळ्यासाठी एकही वृक्ष तोड देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धक आणि पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्री महाजन यांची मोठी कोंडी झाली आहे.
कुंभमेळ्यााठी वृक्षतोड होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं सयाजी शिंदे म्हणाले. १०० जणाचं बलिदान देऊ पण नाशिकमध्ये एकही जाड तोडू देणार नाही. एक झाड तोडून दहा झाडे लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे या भाषेत त्यांनी प्रत्यक्षपणे महाजन यांनाच खडसावलं आहे. एका जरी वृक्षाला हात लावला तरी लोक पेटून उठतील असं शिंदे म्हणाले.
सरकार आपलं असतानाही इतकं बेजबाबदार वागत आहे. माझ्या तोंडात आता शिव्या येत आहेत, इतका राग येतोय की असं म्हणत शिंदे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. हुकुमशाही आहे की लोकशाही हेच समजत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी झाडांवरून राजकारण करू नका असंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.