Seema Hiray, Sudhakar Badgujar,Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : सीमा हिरे तडफेने बोलल्या, बडगुजर यांना कडाडून विरोध केला... पण, बावनकुळेंनी सगळेच आक्षेप किरकोळात काढले !

Seema Hire opposes Sudhakar Badgujar’s BJP entry; Bawankule backs Badgujar : सीमा हिरे यांच्या आरोपांनंतर बडगुजर यांना पक्षात घेण्याचा विचार भाजप डोक्यातून काढून टाकेल असे वाटत होते. मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या सर्व आरोपांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांच्या आरोपांना कवडीचेही महत्व दिलेले नाही.

Ganesh Sonawane

BJP Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर ठाकरे गटाने कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर भाजपामध्ये जाणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे. असे असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी मात्र सीमा हिरे यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत बडगुजर यांना पक्षात रेडकार्पेट टाकलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी (दि.५) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवायचे आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या भूमिकेमुळे नाशिक भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काल सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, बडगुजर विरोधात मी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी विखारी प्रचार करत, कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असून नुकत्याच निवडणुकीत मिळालेल्या मतांवरुन त्यांचा जनाधार स्पष्ट होतो. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परदेशात कॅसिनो खेळल्याचे कथित फोटो बडगुजर यांनीच मीडियाला दिल्याचा आरोप सीमा हिरे यांनी केला.

नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती. त्याचे तक्रारदार बडगुजर होते. सलीम कुत्ता बरोबर नाचणाऱ्याला पक्षात घ्यायचे का? ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील, असा आरोप सीमा हिरे यांनी केला. भाजप बडगुजर यांना स्विकारणार नाही असा दावाच त्यांनी केला होता. त्यामुळे सीमा हिरे यांच्या आरोपांनंतर बडगुजर यांना पक्षात घेण्याचा विचार भाजप डोक्यातून काढून टाकेल असे वाटत होते. मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या सर्व आरोपांकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांच्या आरोपांना कवडीचेही महत्व दिलेले नाही.

यातून बावनकुळे यांनी सीमा हिरे व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांना हिणवल्याचा संदेश गेला आहे. सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्यावर केलेले आरोप एका फटक्यात बावनकुळे यांनी फेटाळून लावेल आहेत. सीमा हिरे व बडगुजर विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधातील उमेदवार होते. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद असतील. त्याला फार महत्व देण्याची गरज नाही. शिवाय आरोप झाल्याने काहीही होत नाही, ते सिद्ध कुठे झाले आहेत असं म्हणत एकप्रकारे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला बावनकुळे यांनी ग्रीन सिग्नल दिला.

बावनकुळे हे बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी इतके उतावीळ झाले की, त्यांनी पक्षातील आमदारांचाही विचार केला नाही. अशाप्रकारे हिणवल्याने आमदार सीमा हिरे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे काहीशी निराशा पसरल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT