Nashik Politics : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध... सीमा हिरे पदर खोचून मैदानात; धू-धू धुतलं, गुन्ह्यांची कुंडलीच काढली!

नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची आज (बुधवारी) पक्षातून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे.
Seema Hire’s Strong Opposition to Sudhakar Badgujar’s BJP Join
Seema Hire’s Strong Opposition to Sudhakar Badgujar’s BJP JoinSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची आज (बुधवारी) पक्षातून हकालपट्टी झाली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असतानाच भाजपच्या आमदार सीमा हिरे पदर खोचून उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत बडगुजर यांची गुन्ह्यांची कुंडलीच बाहेर काढली. तसेच त्यांच्या भाजपप्रवेशाला कडाडून विरोध केला.

सीमा हिरे म्हणाल्या, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये बडगुजर यांचा पराभव केला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना धमकावणे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बडगुजर यांच्या विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर त्यांनी पार्टी करून डान्स केला होता. भाजप नेते बावनकुळे यांच्या प्रदेश दौऱ्यात त्यांच्या कसिनोचा फोटो देखील बडगुजर यांनीच व्हायरल केला. नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठविण्याचे काम बडगुजर यांचेच होते.

सुधाकर बडगुजर महापालिकेत टेंडर भरतात. त्यानंतर टेंडर मागे घेण्यासाठी आर्थिक तडजोड करतात. त्यांच्या मुलाने एका व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे. या गुन्ह्यांबाबत त्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्हे लपविण्यासाठी त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. बडगुजर यांच्यामुळे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना पक्ष सोडावा लागला आहे, अशीही खदखद हिरे यांनी व्यक्त केली.

Seema Hire’s Strong Opposition to Sudhakar Badgujar’s BJP Join
Sudhakar Badgujar Politics: शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेते सुधाकर बडगुजर यांना भाजप नेते म्हणतात, नो एंट्री!

भाजप पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. पक्षात लोकशाही आहे. प्रतिमा मलीन असलेल्या व्यक्तीला किती मतदान झाले हे पाहून पक्षश्रेष्ठी विचार करतील. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही शतप्रतिशत भाजप असा नारा दिला आहे. भाजपचे सर्व नगरसेवक निवडून येतील यासाठी आमचे जोरदार प्रयत्न आणि परिश्रम सुरू आहेत. बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यास पक्ष बॅक फुटवर जाईल. त्यामुळे कोणत्याही स्थितीत बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये यावर आम्ही ठाम आहोत. बडगुजर यांची चर्चा होताच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी फोन करून त्याला विरोध असल्याचे कळविले आहे, असेही हिरे यांनी सांगितले.

Seema Hire’s Strong Opposition to Sudhakar Badgujar’s BJP Join
Sudhakar Badgujar: ठाकरेंचा निर्णय सुधाकर बडगुजर यांनी स्वीकारला; नव्या पक्षात प्रवेशाच्या हालचाली

वरील परिस्थितीचा विचार करता, त्यांच्यावर दाखल गुन्हे पाहता आणि डागाळलेली प्रतिमा यातून पवित्र होण्यासाठीच बडगुजर यांची भाजपमध्ये येण्याची त्यांची इच्छा दिसते. त्यांच्या प्रवेशाच्या केवळ चर्चा आहे. याबाबत पक्षात अथवा पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षात वरिष्ठ निर्णय घेतात. मात्र बडगुजर यांना पक्षात घेण्यास आमचा विरोध असेल असे आमदार हिरे यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाचे उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकर यांसह विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com