Nashik News, 12 Jul : विधिमंडळात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याला काल वेगळे वळण लागले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचा नेताच या घोटाळ्याचा मास्टरमाइंड निघाला. त्यामुळे शिक्षण विभागातील या घोटाळ्याचा राजकारणाशी थेट संबंध निघाला.
शिक्षण विभागात बनावट शिक्षक नियुक्ता आणि शाळांच्या मान्यता दाखविण्यात आल्या. त्यातून 160 कोटींचे अनुदान हडप करण्यात आले. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपायुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती. पथकाला शनिवारी मोठे यश आले.
शालार्थ आयडी घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रशांत वाडीले याला धुळे येथून अटक झाली. प्रशांत वाडीले याचे धक्कादायक कारनामे पुढे आले आहेत. शिक्षकांच्या बनावट नियुक्त्या आणि शाळांना मान्यता नसताना जुन्या आदेशांचा दुरुपयोग त्याने केला. यासाठी शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करण्यात आली.
प्रशांत वाडीले याच्या कागदोपत्री 54 शिक्षण संस्था आढळले आहेत. तो 65 आश्रम शाळांचा सर्वेसर्वा आहे. त्यातून त्याने शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यामधून राज्य शासनाचे 160 कोटींचे अनुदान हडप करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तो शिक्षक आघाडीचा धुळे जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्याची राजकीय कनेक्शन पुढे आले आहे.
विशेष म्हणजे प्रत्यक्षात शाळा नसताना कागदोपत्री खेळ रचून त्याने एवढा मोठा घोटाळा केला. अटक केलेल्या वाडीले याच्या साक्री आणि शिंदखेडा येथे दोन शिक्षण संस्था आहेत. तेथे विनाअनुदानित शाळा आहे. प्रत्यक्षात बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याने असंख्य शाळा आणि संस्था काढल्या होत्या.
नाशिक पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे चारला वाडीले गाढ झोपेत असताना त्याला ताब्यात घेतले. या घोटाळ्यात अटक झालेला तो चौथा आरोपी आहे. यासंदर्भात पोलिसांनी यापूर्वीचा अकरा हजार पानांच्या आरोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.