FDA Action : FDA ची मोठी कारवाई! पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधनांसह 90 लाखांचा संशयित साठा जप्त

FDA Maharashtra seizes illegal Pakistani cosmetics : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाईचा सपाटा लावला आहे. या कारवाईमुळे भेसळखोर आणि माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
illegal Pakistani cosmetics; FDA Maharashtra And IAS Tukaram Mundhe
illegal Pakistani cosmetics; FDA Maharashtra And IAS Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra FDA Action News : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना तयार केलेली आयुर्वेदिक औषधे, दिशाभूल करणारे दावे करणारी सौंदर्यप्रसाधने आणि रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअरमधील गंभीर अनियमिततांवर मोठी कारवाई केली. ८ ते १० जुलैदरम्यान नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे छापासत्र राबवून सुमारे ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित साठा जप्त करण्यात आला.

नांदेडमध्ये ‘अफराह कलेक्शन’ येथे पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश ब्युटी क्रीम, उजोबा एक्स्ट्रा व्हाइट आणि गोल्ड ग्लीम या सौंदर्यप्रसाधनांचा साठा एफडीएने जप्त केला. या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कल्पतरू आयुर्वेद येथे विनापरवाना भस्म व रस औषधांचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आढळले आहे. उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, मुदत, उत्पादकाचे नाव किंवा परवाना क्रमांक नमूद नसल्याने ५०.३६ लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला.

illegal Pakistani cosmetics; FDA Maharashtra And IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांना देशभरातील बड्या IAS अधिकाऱ्यांचे फोन : भेसळखोरीच्या मुळावरच घाव घालण्याचा प्लॅन

बीडमध्ये मेरा रूप शृंगार क्रीम या उत्पादनावर त्वचा उजळण्यासंदर्भातील दिशाभूल करणारे दावे आढळल्याने ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सोलापूरमधील नोबल रुग्णालयाशी संलग्न मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन न नसताना औषधविक्री, शेड्युल एच आणि एच१ औषधांची नियमबाह्य विक्री, कालबाह्य औषधांचे अयोग्य व्यवस्थापन आणि थंड साखळीतील औषधे बाहेर ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने स्टॉप ॲक्टिव्हिटी आदेश देण्यात आले.

बीडमध्ये मेरा रूप शृंगार क्रीम या उत्पादनावर त्वचा उजळण्यासंदर्भातील दिशाभूल करणारे दावे आढळल्याने ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सोलापूरमधील नोबल रुग्णालयाशी संलग्न मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन न नसताना औषधविक्री, शेड्युल एच आणि एच१ औषधांची नियमबाह्य विक्री, कालबाह्य औषधांचे अयोग्य व्यवस्थापन आणि थंड साखळीतील औषधे बाहेर ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने स्टॉप ॲक्टिव्हिटी आदेश देण्यात आले.

illegal Pakistani cosmetics; FDA Maharashtra And IAS Tukaram Mundhe
Tukaram Mundhe : दूध भेसळीच्या हॉटस्पॉटवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक : आठवड्याभरातच उद्ध्वस्त केलं आणखी एक रॅकेट

छत्रपती संभाजीनगरमधील कृपामाई रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये कर्करोग रुग्णांना संलग्न स्टोअरमधूनच औषधे घेण्यास भाग पाडल्याचे उघड झाले. तपासणीत अनेक गंभीर नियमभंग आढळल्याने संबंधित मेडिकल स्टोअरचा विक्री परवाना रद्द करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com