Mahamandaleshwar Shankranand with Sadhus Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahakumbh News: नेते, मंत्र्यांच्या दौऱ्यांनी साधुसंत वैतागले... केली ही मागणी!

Shankaranand Saraswati; Sadhus are upset that the Mahakumbh Mela is being disrupted by the visits of leaders-प्रयागराज महाकुंभमेळ्यात राजकीय नेते आणि मंत्र्यांसाठी केली जाते भाविकांची गैरसोय

Sampat Devgire

Mahakumbh News: महा कुंभमेळा आता रंगात आला आहे. आता सगळ्यांनाच दुसऱ्या शाही स्नानाचे वेध लागले आहेत. हजारो साधू आणि धार्मिक नेत्यांनी येथे तंबू टाकले आहेत. या सर्वांची शाही स्नानाची तयारी सुरू आहे.

प्रयागराज येथील महा कुंभमेळा यंदा जागतिक स्तरावर आकर्षण बनला आहे. पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करून प्रत्येकालाच पवित्र होण्याचे वेध आहेत. त्यात भारतीय राजकीय नेते आणि मंत्र्यांनी ही संधी सोडली तरच नवल.

यंदाच्या महा कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द उत्तर प्रदेश शासनानेच व्हीआयपी आणि मंत्र्यांसाठी खास व्यवस्था केली आहे. व्हीआयपी आल्यानंतर सर्व प्रमुख रस्ते बंद केले जातात. त्रिवेणी संगमापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरच प्रवेश बंद होत आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

महा कुंभमेळ्यात येत्या पाच फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर 2 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार आहेत. राजनाथ सिंग यांसह विविध केंद्रीय मंत्र्यांनी यापूर्वीच महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या देखील भेट देणार आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांनी नुकतीच कुंभमेळ्याला भेट दिली.

यावेळी माजी मुख्यमंत्री यादव यांनी अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केलेल्या व्यवस्थेने भाविकांची आणि साधूंची परवड त्यांनी अनुभवली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांनीही महत्त्वाच्या व्यक्तींसाठी होणारी व्यवस्था आणि त्यांचे लाड तातडीने बंद करा या शब्दात कुंभमेळा प्रशासनाला खडसावले आहे.

कुंभमेळा प्रशासनाकडून अति महत्त्वाचे व्यक्ती मंत्री यांच्यासाठी राजशिष्टाचार सांभाळण्यासाठी तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तीन उपजिल्हाधिकारी आणि तीन तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. 21 विश्रामगृहांमध्ये 314 विशेष अतिथी कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महाकुंभमेळ्यात दररोज विविध मंत्री आणि अति महत्त्वाच्या व्यक्ती त्रिवेणी संगमावर स्नान करायला येत आहेत. या कालावधीत संगमावरील प्रवेश बंद केले जातात. प्रमुख रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद असतात.

व्हीआयपी सुविधांचा फटका अनेक साधू आणि आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे आता मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्यांना साधूही वैतागले आहेत, असे तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले. ही व्यवस्था सुधारली नाही तर, कुंभमेळा अधिकाऱ्यांना घेराव घालून मंत्री आणि व्हीआयपी दौरे बंद पाडण्यासाठी भाग पाडले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्याला येणारे बहुतांशी भाविक आपल्या परिचित महंत महामंडलेश्वर आणि आखाड्यांमध्ये निवास करतात. आपल्या गुरूंच्या तसेच साधूंच्या सहवासात राहण्यासाठी त्यांची धडपड असते. प्रत्यक्षात मात्र अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळी हा सबंध परिसर अक्षरशः जेल वाटावा, अशी स्थिती बनतो. त्यामुळे भाविकांंबरोबरच साधू ही प्रचंड वैतागले आहेत.

मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे कुंभमेळ्याची व्यवस्था बिघडते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आखाडा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्याकडे व्हीआयपी दौरे बंद करा, अशी मागणीच केली. संत साधूंच्या या मागणीने कुंभमेळा अधिकाऱ्यांची ही चांगलीच त्रेता तिरपीट उडाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT