Prataprao Dhakane, Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : 'काका, तुमचे अनेक सल्ले मी ऐकतो बरं का'; अजित पवार गटाचे आमदार लंके असं कुणाला म्हणाले?

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी मोठा सल्ला दिला आहे. आमदार नीलेश लंके सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटासोबत आहेत. ढाकणे यांच्या सल्ल्यानंतर आमदार लंके यांनीही लोकसभा निवडणुकीबाबत सूचक संकेत दिले आहेत.

ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 'आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्यामधील कार्यकर्ता जिवंत ठेवला आहे. त्यांनी आमदारकी कधीच अंगात येऊ दिलेली नाही. अनेक आमदार आहेत, मात्र लंके यांनी आपल्या कार्याचा ठसा राज्यभर उमटवला आहे. तरुणांना आकर्षित करण्याची ताकद त्यांच्यात आहे. कुणीही अन् कधीही बोलवा ते प्रत्येकाला वेळ देतात. हात दाखवा अन् गाडी थांबवा, असा हा कार्यकर्ता आहे.'

'असा तरुण, लोकप्रिय, सर्वसामान्याशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी दिल्लीत गेला पाहिजे ही लोकभावना आहे. माझा वडिलकीच्या नात्याने त्याला आग्रहाचा सल्ला आहे. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल जनतेच्या मनात आदर आहे. मात्र शरद पवारसाहेब (Sharad Pawar) आदरणीय आहेत.आमदार लंके यांनी मोठ्या साहेबांसोबत येऊन लोकसभा (Loksabha Election) लढवावी, असा माझा सल्ला राहील', असे आवाहन अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार नीलेश लंके यांनी देखील ढाकणे यांना खुमासदार शैलीत प्रतिसाद दिला आहे. 'काका तुम्ही माझे आदर्श आहात. तुमचे अनेक सल्ले मी ऐकतो बरं का' आमदार लंके यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत आताच घोषणा करा, असा आग्रह केला. त्यावर ढाकणे यांनी उपस्थितांनी, असा आग्रह करू नका, असे म्हणत शांत केले. आमदार नीलेश यांनी दिवंगत संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) यांच्या संघर्षमय नेतृत्वाचा अभ्यास करून मी जमिनीवर राहून वाटचाल करत आहे, असे स्पष्ट केले.

ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या आवाहनाला आमदार लंके यांनी दिलेल्या संकेताची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धायतडक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आमदार नीलेश लंके आणि ॲड. प्रताप ढाकणे एकत्र आले होते.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT