Ramdas Athawale News : आठवलेंच्या RPIमध्ये गटबाजी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांनी उडवला गोंधळाचा बार

RPI Athawale Group Politics News North Maharashtra : रामदास आठवलेंच्या रिपाईत गटबाजीला उधाण...
Ramdas Athwale
Ramdas Athwale Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीवरून आता केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र आरपीआय पक्षात घमासान सुरू झाल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी RPI ची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी अजून जाहीर केलेली नाही. त्यामुळे सुनील साळवे यांना बढती कशी आणि त्यांच्या जागी नवीन जिल्हाध्यक्षाची निवड कशी? असे प्रश्न उपस्थित करून पद निवडीच्या गोंधळात आणखी भर घातली.

Ramdas Athwale
Raj Thackeray News : दोन्ही ठाकरेंची नजर नाशिकवर; आता राजही चार दिवस ठोकणार तळ

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा तीन फेब्रुवारीला कोपरगाव आणि श्रीरामपूर दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरीतील बैठकीत जिल्हाध्यक्ष बदल, उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत पद बहाली यासर्व बाबी आपल्या परस्पर झालेल्या आहे. मुळात या नियोजन बैठकीची माहितीच आपल्याला नव्हती, असा गौप्सस्फोट करताना एका विभागाच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेले निर्णय मान्य होणारे नाहीत.

मुळात उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी अजून जाहीर झालेली नाही. त्यासाठी पाचही जिल्ह्यातून नावे मागवली आहेत. त्यावर विचारमंथन होऊन राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहमतीने कार्यकारिणी घोषित होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारणीमध्ये कोणी परस्पर निवड घोषित केली असेल तरी आपल्यापर्यंत आलेली नाही. त्यावर काही बोलायचे नसल्याचे प्रकाश लोंढे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्याकडून हटवून कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांचा जिल्हाध्यक्षपदी केलेला फेरबदल आणि साळवे यांची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत सचिवपदी दिलेले पद यावर लोंढे बोलले.

मुळात आरपीआय पक्षात अशा पद्धतीने कधीही पदांमध्ये परस्पर बदल होत नाही. यासाठी पक्षाच्या संकेतानुसार बदल करावयाच्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत क्रियाशील सदस्य-पदाधिकारी यांची बैठक होते. त्यात पदे बदलणे, बढती आदी निर्णय होतात. त्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांची संमती, मार्गदर्शन असते. तसेच कोणतेही पदाधिकाऱ्यांच्या पदात बदल करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले काळजी घेतात. तीस ते चाळीस वर्षे कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षासोबत राबत असतात. अशा वेळी संघटनात्मक बदल करताना सर्वांचा सन्मान राखला जातो. हा पायंडा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाडून दिलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणाला व संकेतांना बाजूला सारून काही झालेले निर्णय वरिष्ठांपर्यंत आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी लवकरच राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव यांच्या सोबत चर्चा करून घोषित केली जाईल. मला माहितीच नसलेल्या निर्णयावर काही बोलण्यास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी नकार दिला. एकप्रकारे सुनील साळवेंबाबत परस्थिती जैसे-थे असल्याचे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

edited by sachin fulpagare

Ramdas Athwale
Raj Thackeray Today News : ठाकरेंचा नाशिकवर विश्वास; सलीम शेख नवे प्रदेश उपाध्यक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com