Sharad Pawar Pravaranagar visit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Pravaranagar visit : पवार-थोरात-वळसे पाटलांची एकाच वाहनातून भाजप नेते विखेंच्या बालेकिल्ल्यात एंट्री!

Sharad Pawar, Balasaheb Thorat and Dilip Walse Patil arrive together in Pravaranagar, triggering major political buzz in Maharashtra : रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटनाला शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि दिलीप वळसे पाटील एकत्र आले होते.

Pradeep Pendhare

Maharashtra political breaking news : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात बुधवारी घडलेल्या एका राजकीय घडामोडीने राज्याच्या राजकारणात चर्चांना जोर आला आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अजित पवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी एकाच वाहनातून दमदार एंट्री घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, या वाहनात शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब थोरात हे मागील सीटवर एकमेकांच्या शेजारी बसलेले होते, तर दिलीप वळसे पाटील चालकाच्या शेजारी समोर बसले होते. या कार्यक्रमाला खासदार नीलेश लंके यांनीही उपस्थिती लावली. प्रवरानगरमध्ये या तीन दिग्गज नेत्यांचे एकत्र आगमन होताच परिसरात राजकीय चर्चांना अक्षरशः पेव फुटले.

या भेटीमागे राजकीय समीकरण नसून शैक्षणिक आणि भावनिक नातं असल्याची चर्चा देखील रंगली आहे. कारण शरद पवार हे प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थे (Rayat Shikshan Sanstha) अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी (Student) आहेत. त्यांनी 1955-56 या काळात याच विद्यालयात इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतले होते. विद्यालयाच्या अमृतमहोत्सव आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते.

विशेष बाब म्हणजे 1990 पासून शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारसरणीबाबत असलेल्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेच्या विस्ताराला मोठी चालना मिळाल्याचे मानले जाते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलीप वळसे पाटील यांनी भूषवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार राष्ट्रवादीत गेलेले वळसे पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत शरद पवार यांची उपस्थिती अनेक राजकीय संकेत देणारी मानली जात आहे.

दरम्यान, राज्यात मान्सूनमुळे वातावरण थंडगार असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील या अनपेक्षित राजकीय भेटीमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रभावशाली नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात विरोधी विचारसरणीचे तीन दिग्गज नेते एकाच वाहनातून दाखल झाल्याने आता पुढील काही दिवस या भेटीची चर्चा रंगणार, हे निश्चित मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT