Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : '1500 रुपये ठीक आहे पण 1500 रुपया पेक्षा...', लाडक्या बहिणीवरून शरद पवारांची टीका

Sharad Pawar NCP mahayuti : जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Roshan More

Sharad Pawar News: लोकसभेला फटका बसलेल्या महायुतीला विधानसभेत लाडकी बहीण योजनेमुळे मोठा लाभ मिळेल. ही योजना विधानसभेला गेमचेंजर ठरेल, अशी शक्यता महायुतीचे नेते व्यक्त करत आहेत. मात्र, राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टिने काही घटना घडल्या होत्या. त्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

'रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर कुठल्यातरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींवर अत्याचार झाला ही बातमी वाचायला मिळते. 1500 रुपये ठीक आहे पण 1500 रुपया पेक्षा आमच्या बहिणीची अब्रू वाचवणं त्यांना संरक्षण देणं, तिचं रक्षण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण त्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक सुरु आहे.', अशी टीका शरद पवार यांनी महायुती सरकारवर केली.

धुळे येथील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. 'गहू-तांदूळ हे महाराष्ट्रात, देशात महत्त्वाचं पीक. मोदी सरकारने त्याच्यावरही बंधनं घातली. जे काही तुम्ही पिकवता आणि तुम्हाला घामाची किंमत ज्या उत्पादनावर मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूत्र आजच्या मोदींच्या सरकारने स्वीकारलं आहे. म्हणून आम्ही सांगतो हे मोदी सरकार बळीराजाविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे.', असे टीका शरद पवारांनी मोदी सरकारवर केली.

शेतकऱ्यांची कर्ज माफी केली

शरद पवार म्हणाले, यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाच्या बोज्यामुळे आत्महत्या केली आणि मी अस्वस्थ झालो. तेव्हा दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आग्रह केला आणि 71 हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्यांनाकर्ज मुक्त करण्याचा निकाल घेतला. जे कर्ज घेतात आणि वेळेवर फेडतात त्यांना जी 14 टक्के, 12 टक्के व्याजाचा दर होता तो 6 टक्के, 4 टक्के पर्यंत आणला, फक्त नियमित परत करणे ही अट घातली आणि कमी व्याजामध्ये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला.

महायुतीला सत्तेतून घालवण्याचे आवाहन

'आज लोकांना अनेक समस्या आहेत. महागाई सारखे ही संकट आहे. बेकारीचं संकट आहे. आजचं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही पावलं टाकत नाही. आजचं सरकार भगिनींना प्रपंच चालवायला, महागाई तून सुटका करायला जे करायला हवं त्यासाठी उपाययोजना करत नाही. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी मिळेल त्यावेळेस त्यांच्या हातातून काढून घेणे आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणे हे ऐतिहासिक काम तुम्हाला करायचा आहे.', असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT