Nilesh Lanke victory Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke victory Ahilyanagar DCC Bank Election : राजकीय धक्का, मंत्री विखे समर्थकाचा करेक्ट कार्यक्रम! नीलेश लंके जिल्हा बँकेत विजयी; सहमती एक्स्प्रेसला मोठा झटका

Nilesh Lanke defeats Rahul Shinde, close aide BJP Radhakrishna Vikhe Patil, Ahilyanagar DCC Bank election, challenging the Vikhe-Thorat alliance : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदेंचा पराभव करत खासदार लंके यांनी जिल्हा बँकेत खाते उघडले; विखे-थोरातांच्या राजकीय गणितात नवी डोकेदुखी?

Pradeep Pendhare

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेस धोबीपछाड देत, सहकार परिवर्तन पॅनलचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी जोरदार एन्ट्री घेतली.

खासदार लंके यांनी जिल्हा बँकेत विजय मिळवत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांना पराभूत केले. सेवा सोसायटी मतदारसंघात नीलेश लंके यांना 64, तर राहुल शिंदे यांना 40 मते मिळाली. खासदार लंके यांनी 24 मतांनी विजय मिळावला. याचबरोबर, जिल्हा सहकारी बँकेत शरद पवार यांचे जास्तच लक्ष असेल, असा सूचक इशारा दिला जाऊ लागला आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार लंके (Nilesh Lanke) आणि राहुल शिंदे यांच्या लढतीकडे लक्ष लागले होते. राहुल शिंदे हे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. यातच जिल्हा बँकेत मंत्री विखे पाटील-काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची सहमती एक्सप्रेस होती. याच भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे देखील स्वतंत्र उमेदवार होते. त्यामुळे लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेस समोर खासदार लंके जिल्हा बँकेत (DCC Bank) कोणता चमत्कार करतात, याकडे लक्ष लागले असतानाच, त्यांनी आज विजय खेचून आणला. विखे पाटील यांनी देखील आपल्या उमेदवारामागे ताकद उभी केली होती. त्यामुळे लढत रंगणार अशीच चिन्हे होते. नीलेश लंके यांनी हा विजय मिळताच जिल्ह्याच्या सहकारात पहिली एन्ट्री घेतली.

सुजय विखे-नीलेश लंके पुन्हा आमने-सामने

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार लंके यांना मतदानाच्या दिवशी डिवचताना, बँकेत गोंधळ घालणाऱ्यांचा मतदारच बंदोबस्त करतील, असे म्हटले होते. पण मतमोजणीच्या दिवशी उलटा फेर होत, खासदार लंके विजयी झाले. याचबरोबर जिल्हा बँकेच्या राजकारणात शरद पवार यांचे लक्ष राहणार, असे सूचक संकेत मिळाले.

खासदार लंके-विखे पाटील यांच्यातील कुरघोड्यांचे राजकारण सर्वश्रुत आहे. यातच खासदार लंकेंनी जिल्हा बँकेत एन्ट्री मिळवत, यात आणखी एक कुरघोडी केली आहे. लोकसभा निवडणुकीला लंकेंनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. आता जिल्हा बँकेत सुजय विखे पाटील आणि खासदार लंके आमने-सामने असणार आहेत. म्हणजेच कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा सहकारात आमने-सामने येणार असल्याने जिल्हा बँकेचे राजकारण ढवळून निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT