Sharad Pawar, Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : ‘भाजप पक्ष कुणी उभा केला असेल तर...’; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात शरद पवारांनी घेतली दोन नेत्यांची नावे

Sharad Pawar On Eknath Khadse BJP : भाजपला उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. भाजप पक्ष कुणी उभा केला असेल तर त्या यादीत नाथाभाऊंचे नाव घ्यावे लागेल असेही पवार म्हणाले.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : भाजपला उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंनी भाजपमधे काम केलं, भाजप पक्ष कुणी उभा केला असेल तर नाथाभाऊ आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्याव लागेल, असे म्हणत महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत एकनाथ खडसेंचं योगदान शरद पवारांनी अधोरेखित केलं.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने रविवारी (दि. ३०) मुक्ताईनगरमध्ये सोहळा पार पडला. या सोहळ्याला खासदार तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळात भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित होते. पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी ज्या लोकांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यात प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असही शरद पवार म्हणाले.

खडसेंनी या वाढदिवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाला भाजपचा एकही वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे, खडसेंनी मैत्रीचा हात पुढे केला मात्र, भाजपमधील नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखल्याचे दिसले.

शरद पवारांनी मात्र, आपल्या भाषणात एकनाथ खडसे यांचे भाजप उभी करण्यात मोठे योगदान असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ खडसे या भागाची सेवा करत आले आहेत. या मतदारसंघाने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर एकाचवेळी तब्बल 12 खाती सांभाळणारा एकमेव मंत्री नाथाभाऊ होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात 1967 ला मी देखील निवडून गेलो. त्यानंतर विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आणि प्रभावीपणे बोलणाऱ्या सदस्यांकडे आपले विशेष लक्ष असायचे, त्यामध्ये विधानसभेच्या सभागृहात दोन माणसांची भाषणे कायम लक्षात राहिली. त्यातीलच एक नाथाभाऊ होते. सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले. विरोधी बाकावर असताना देखील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न खडसे यांनी आक्रमकपणे मांडले, असे म्हणत शरद पवारांनी एकनाथ खडसेंचं कौतुक केलं.

भाजपमध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठी त्यांच्यासारख्या लोकांची गरज असल्याचे लक्षात ठेवून आम्ही त्यांना विधान परिषदेवर संधी दिल्याचे पवारांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT