Sharad Pawar : मतभेद विसरले, जळगावात शरद पवारांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र का आले?

Sharad Pawar Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon NCP Politics : आमदार एकनाथ खडसे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज रविवार (दि. ३०) जळगावात दाखल झाले. सकाळी येथील विमानतळावर उतरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) असे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी विमानतळावर शरद पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांचे स्वागत केले. त्यामुळे जळगावमधील या घडामोडीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले. त्यातूनच निर्माण झालेल्या राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे पदाधिकारी एकाच ठिकाणी दिसल्याने हा प्रसंग अधिक लक्षवेधी ठरला. त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चा पुन्हा रंगत आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP: मोठी बातमी: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, आव्हाडांसह कुणाला मिळाली संधी?

विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी "महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जे काही चांगले होते, ते जळगावातून होते," भारतात मंगळग्रह मंदिर केवळ जळगाव जिल्ह्यात असल्याचा उल्लेख करत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सूचक विधान केलं.

तर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष वेगळे झाले असले तरी आजही त्यांची मूळ विचारधारा एकच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी म्हटले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचे स्वागतच आहे असे मत प्रमोद पाटील यांनी व्यक्त केलं. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत स्थानिक पातळीवरही हालचाली होऊ शकतात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar News: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गट वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील संबंध कायम असल्याचे या निमित्ताने दिसून आले. विशेष म्हणजे, यापूर्वी दिवंगत नेते अजित पवार हयात असताना जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले असतानाही दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये असलेले वैचारिक आणि राजकीय संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com