Eknath Khadse : "शरद पवारांनी आसरा दिल्यानेच..."; एकनाथ खडसे भावूक, भरकार्यक्रमात सगळे सांगितले

Eknath Khadse Speech : मला काही दिवस मागच्या काळात ब्रेक दिला. मात्र, शरद पवार यांनी मला उजेडात आणले, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
sharad pawar, Eknath Khadse
sharad pawar, Eknath Khadsesarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जनतेने मला अनेक वर्ष प्रेम दिले. 1990 साली जयंतराव पाटील, रामदास आठवले, वळसे पाटील यांच्याही संबंध आला. विरोधी पक्षात राहून सुद्धा मला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मला मदत केली. मागच्या काळात विरोधी पक्ष एकमेकांना मदत करायचे मात्र व्यक्तिगत मतभेद तेव्हा नव्हते. अनेक वर्ष मी भाजपच काम केले. मात्र, राजकारणामध्ये काही चढउतार आले. शरद पवार यांनी मला आसरा दिला. मला काही दिवस मागच्या काळात ब्रेक दिला. मात्र, शरद पवार यांनी मला उजेडात आणले, असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

माजी मंत्री एकनाथ खडसेंचे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री अरुणाभाई गुजराथी, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, राजकीय प्रवासात अनेक मित्र जोडले. मला राजकारणात प्रमोद महाजन यांनी प्रमोट केले. मुंडे, महाजनांचे राजकारण वेगळे होते. त्यांनी महाराष्ट्रात पक्ष रुजवला. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे, नाथाभाऊ यांची मैत्री महाराष्ट्राला माहीत आहे. 2000 ते 2014 पर्यंत भाजपचे सरकार नव्हते, मात्र कार्यक्रमांचा पाया भक्कम होता म्हणून हे भाजपला दिवस आले. प्रमोद महाजन यांनी मला बळकटी दिले. आताच राजकारण पाहून मला वेदना होतात. प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण आताच राजकारण यात फार बद्दल झाले आहे. मुलगा गेला त्या वेळेस मला परिवाराने साथ दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

sharad pawar, Eknath Khadse
Maharashtra Politics Live Update: 'चोरलेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे राहू नये...': आदित्य ठाकरे

"महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून केले. तापी खोरे महामंडळ, गोदावरी खोरे महामंडळ, कृष्णा खोरे महामंडळ उभे केले. यामुळे जलसिंचनाची कामे पार पडली. एवढे काम केले, पण व्यक्तिगत मतभेद ठेवले नाहीत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, त्याचा अनुभव तुम्ही घेत आहात. एवढी वर्षे सामाजिक स्वास्थ्य कधी बिघडू दिले नाही. मुक्ताईनगर नामकरण करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले. मंदिराचा पैसा अडवण्याचे पाप मी कधीच केले नाही, गेल्या सात वर्षात मुक्ताई मंदिरासाठी निधी मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

sharad pawar, Eknath Khadse
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com