NCP Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Latest News : नाशिकचे आमदार अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत?

Sampat Devgire

Pawar Vs Pawar News: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी सहानुभूती दिसून आली. तिचे रूपांतर मतदानात झालेले दिसते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच नाशिकमध्ये झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना मतदारांकडून अनपेक्षित आणि मोठे सहकार्य मिळाले. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीत जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये अजित पवार गटात गेलेले आमदार अस्वस्थ असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आमदारांपासून अंतर ठेवून होते. सोशल मीडियावर या आमदारांच्या भाजपला मतदान करा या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यामुळे संबंधित आमदार अस्वस्थ झाले आहेत.

अस्वस्थ झालेले आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात परतण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे या आमदारांनी शरद पवार यांना अडचणीच्या काळात दगा दिला केवळ निधी आणि टक्केवारीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे या आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) अनेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण बदलले आहे. विशेषतः निफाड मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अनिल कदम यांनी हिरिरीने प्रचार केला. मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला कार्यकर्त्यांनी ही कदम यांचे कौतुक केले आहे. सध्या कदम शरद पवार यांच्या अतिशय निकट आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही नेते अस्वस्थ झाले आहेत.

दिंडोरी मतदारसंघात (Dindori Constituency) देखील अशीच स्थिती आहे. येथील विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ सध्या अजित पवार गटात आहेत. मात्र त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. बदललेली राजकीय परिस्थिती विचारात घेता, त्यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा त्यांच्यावर दबाव असल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार गटाला (NCP) मोठा धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT