Hemant Godse Politics : खासदार गोडसे वैष्णव देवीच्या चरणी, म्हणाले 'माझा विजय निश्चित' !

Hemant Godse confident, wins with lead in five Vidhan Sabha constituencies : आमदारांना प्रचारासाठी जी जी मदत लागेल ते सर्व पुरविण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे मतदानानंतर हे आमदार तसेच पदाधिकारी यांनी केलेल्या आकडेमोडीतून मतदारसंघातील सिन्नर वगळता सर्व पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे त्याला आघाडी मिळेल, असा दावा केला जात आहे...
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama

Hemant Godse News : लोकसभा निवडणुकीचे पाचव्या टप्प्यातील नाशिक मतदार संघाचे मतदान पार पडले.आता सगळ्यांना निवडणुकीच्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे. या सर्व धामधुमीत खासदार हेमंत गोडसे जम्मू कश्मीरला वैष्णव देवीच्या चरणी दाखल झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्याने उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या चाचपणी करण्यात व्यस्त आहेत. अनेक जण कोण विजयी होणार, याचे अंदाज बांधत आहेत. काही कार्यकर्ते उतनिहाय झालेल्या मतदानाचा अभ्यास करण्यात गर्क आहेत. या सर्व व्यवस्थेत गेली दोन महिने निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त राहिलेले कार्यकर्ते आता निवांत झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Godse
Chhagan Bhujbal News: भुजबळांच्या विधानात चुकीचं काय? राष्ट्रवादीच्या नेत्यानं घेतला राणेंचा समाचार

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे मतदान संपल्यानंतर निवडक सहकाऱ्यांसह वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले आहेत. गोडसे नियमितपणे कटरा येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. निवडणुकीचे मतदान संपल्याने आपण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे हमखास विजय होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

गोडसे म्हणाले, नाशिक (Nashik) मतदार संघात गेले दहा वर्ष केलेली कामे सामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी सातत्याने केलेले परिश्रम हे आपले मुख्य बळ आहे. यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे विविध पक्ष होते. या सर्वांच्या परिश्रमामुळे मतदारांचा मोठा संपर्क झाला. त्यामुळे प्रचारात देखील पहिल्यापासून आपण आघाडी घेतली होती. त्याचे फलित मतदानातून जाणवले.

Hemant Godse
BJP Vs MNS: लोकसभेच्या निकालापूर्वीच मनसेनं भाजपवर टाकला डाव; कोकणाच्या लाल मातीत रंगणार 'कुस्ती'

मतदार संघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या आमदारांना प्रचारासाठी जी जी मदत लागेल ते सर्व पुरविण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे मतदानानंतर हे आमदार तसेच पदाधिकारी यांनी केलेल्या आकडेमोडीतून मतदारसंघातील सिन्नर वगळता सर्व पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे त्याला आघाडी मिळेल. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. त्याबाबत मला कोणतीही काळजी नाही, असे गोडसे म्हणाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर आणि भगूर नगरपालिकेसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डातील बहुतांश नगरसेवक महायुती बरोबर होते. नाशिक शहरात शंभरहून अधिक नगरसेवक आहेत. त्या सर्वांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत.

शिंदे गटाची तसेच माझे विविध समर्थक नियोजन करण्यासाठी यंत्रणा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनता उत्सुक आहे. भारतीय जनता पक्षाने खूप परिश्रम घेतले. त्यामुळे यंदा मोदी लाट नाशिक मतदारसंघात दिसून येईल, असा विश्वास देखील खासदार गोडसे यांनी व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Hemant Godse
Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी फोडला बाॅम्ब; विधानसभा आणि मुंबईत लढवणार एवढ्या जागा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com