Sharad Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Vs chhagan Bhujbal: शरद पवार येवल्यात मोठा धमाका करणार? भुजबळांविरोधातला 'मोहरा' ठरला?

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे एकेकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी येवला मतदारसंघात आपली पकड मजबूत करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसी समाजाचे सक्षम नेतृत्व म्हणूनही पाहिले जाते.

मात्र,राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत अजितदादांसोबत जाणे पसंत केले.त्यामुळे संतापलेल्या पवारसाहेबांनी भुजबळांविरोधात मोहीम उघडली असून येवल्यात तगडा उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.अशातच आता येवल्यातून मोठी अपडेट समोर आली आहे.

माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी बुधवारी(ता.2) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आहे. कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

कुणाल दराडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ( Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी देखील एकदा दराडे कुटुंबियांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

येवला विधानसभा मतदारसंघाची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षालाच जागा राहिल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे.

भाजपच्या नेत्या अमृता पवार याही येवल्यातून छगन भुजबळांविरोधात जोरदार तयारी करत आहे. सहकारमहर्षी (कै.) मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपात असलेल्या अमृता पवार यांची उपस्थिती लावली होती.भुजबळांविरोधात आता शरद पवार येवल्यातून कोणाला उभे करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षण आणि ओबीसींचा वाद यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी केली होती.. या कार्यक्रमाला भुजबळ गैरहजर होते. भुजबळांच्या कट्टर विरोधक म्हणून अमृता पवार यांच्याकडे पाहिले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT