Kolhapur News : राधानगरीत आघाडीची डोकेदुखी वाढली; 'या' नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी 'टफफाईट'

Political News : हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याची शक्यता असल्याने इच्छुकांची महायुतीतून पावले महाविकास आघाडीकडे पडली आहेत. यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांचा समावेश आहे.
banner
banner Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. आघाडीकडून इच्छुकांची भाऊ गर्दी होत असल्याने नेत्यांसमोर उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याची शक्यता असल्याने इच्छुकांची महायुतीतून पावले महाविकास आघाडीकडे पडली आहेत. यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांचा समावेश आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाची निष्ठावंत तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी देखील उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. वास्तविकता या मतदारसंघातील उमेदवार कोण असावा? याबाबत निश्चिती झाली असली तरी या चौघांनीही शाहू महाराज आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील यांचे फोटो फलकावर झळकवले आहेत. त्यामुळे खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील नेमके कोणाचे? अशी विचारण्याची वेळ मतदारांवर आली आहे. (Kolhapur News)

राधानगरी आजरा भुदरगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांची निश्चिती झाल्याची कुणकुण लागतातच महायुतीतील माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष यांनी राम राम ठोकला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी युती धर्म मोडत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीचा रस्ता निवडला आहे. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील भाजपला रामराम ठोकत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्वच इच्छुकांनी मातोश्रीची उंबरे झिजवली असल्याची महायुतीसमोर येत आहे. त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिक प्रकाश पाटील यांनी देखील आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे. या चौघांनी देखील महाविकास आघाडीतून उमेदवारीची प्रयत्न सुरू ठेवले आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी देखील प्रचारात हसन मुश्रीफ यांचे नाव घेत सहकारातील भूमिका जागोजागी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र त्यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

banner
Rohit Pawar : आमदार पवारांनी सरकारला विनंती केली; सरकार किती मनावर घेणार?

एकीकडे असे चित्र निर्माण होत असताना दुसरीकडे या चौघा इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार सतेज पाटील यांचे फोटो या फलकावर उघड उघडपणे लावले आहेत. हे चौघेही या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याने वरिष्ठ नेत्यांपुढेही तेच निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील नेमके कोणाचे अशी शंका मतदारांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

उमेदवार राधानगरीचे, पण मदार कोल्हापुरातील नेत्यांवर

हे चौघेही उमेदवार हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. ए. वाय. पाटील हे राधानगरी तालुक्यातील सोळांकुर येथील आहेत. राहुल देसाई हे गारगोटीतील आहेत. तर माजी आमदार के. पी. पाटील हे मुदाळ येथील आहेत. असे असताना या चारही उमेदवारांना कोल्हापुरातील नेते शाहू महाराज छत्रपती, आणि आमदार सतेज पाटील यांचाच आधार घ्यावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या चेहऱ्याने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ही त्यांचा चेहरा वापरून विजयापर्यंत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे नेमकी कोणाला उमेदवारी देणार? याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

banner
Congress News : काँग्रेसचं जागावाटप कधी? विजय वडेट्टीवारांनी थेट तारीखच सांगितली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com