Sharmishtha Walawalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ACB Traps: सलग तिसऱ्या वर्षी नाशिकला लागला कलंक... काय आहे प्रकरण?

Sharmistha walawalkar; Nashik tops in corruption in the past year too-गतवर्षी वर्षभरात झालेले भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची संख्या यंदा नाशिकने नऊ महिन्यातच ओलांडली

Sampat Devgire

Nashik Politics News: नाशिक सलग तिसऱ्या वर्षी आघाडीवर राहिले आहे. मात्र हे प्रकरण भूषणावह नाही तर मान खाली जावी असे आहे. कारण लाच घेण्याच्या प्रकरणात नाशिकचे विविध शासकीय अधिकारी पुन्हा एकदा राज्यात आघाडीवर राहिले.

मावळत्या वर्षात नाशिकने कोणत्या क्षेत्रात काय कामगिरी केली, याचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करून आघाडी घेतली आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी उघडपणे लाच मागितली. यात फार थोड्या जणांनी एसीबी कडे तक्रार करण्याचे धाडस केले. तेवढ्याच प्रकरणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक विभागात यशस्वी केले. यामध्ये ४९ सापळ्यांमध्ये २१९ लाचखोरांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५७ लाखांची रोकड जमा करण्यात आली. त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे वर्ग एकचे १७ अधिकारी आणि वर्ग २ चे १९ अधिकारी लाचलितपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले. ते पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस मदन गर्गे व सहाय्यक संचालक आरती आळे यांनी दीड लाखांची लाच स्वीकारली हे प्रकरण आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांना सापळ्यात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मावळत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे जवळपास चार महिने आचारसंहिता होती. या कालावधीत शासकीय विभागांना कामाच्या मर्यादा येतात. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामालाही तीन ते चार महिने विराम होता.

गेल्या वर्षी एवढीच प्रकरणी घडल्याने भ्रष्टाचारात आघाडी घेतलेल्या नाशिकचे मान शरमेने खाली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शासकीय कार्यालय आणि तेथील कामकाजाबाबत सामान्यांना अतिशय मनस्ताप व्हावा, असे अनुभव वाट्यास येतात. त्याचा सर्वाधिक जात सर्वसामान्य नागरिकांना होतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात ही कारवाई झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT