Kirit Somaiya Politics: ‘बीड...!’ नावच नको! ‘त्या’ विषयावरही किरीट सोमय्यांचे ‘हाताची घडी तोंडावर बोट’

Suresh Dhus;Mahadev App Beed Kirit Somaiya's cautious response-धक्कादायक आणि आक्रमक आरोप करणारे किरीट सोमय्या महादेव ॲप प्रश्नावर शांतपणे, एका वाक्यात बोलले.
Kirit Sommaiya & Valmik Karad
Kirit Sommaiya & Valmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या धडाकेबाज आरोप करून विरोधकांना नामोहरम करतात. त्यासाठी ते शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर देखील करतात. त्याची सर्वत्र चर्चा असते.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल मालेगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धडाकेबाज आरोप केले. मालेगाव शहर हे बांगलादेशी व रोहिंग्या॑ना भारतीय नागरिक करण्यासाठी काम करते, असा आरोप त्यांनी केला.

Kirit Sommaiya & Valmik Karad
Shivsena UBT Politics: महाविकास आघाडीत धुमश्चक्री? काँग्रेसचा हिशेब शिवसेना चुकता करणार!

किरीट सोमय्या यांच्या या आरोपांनी खळबळ उडाली. मात्र याच वेळी मनमाड येथे पत्रकारांनी सोमय्या यांच्याशी चर्चा केली. यावेळी बीड येथील महादेव ॲप मध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याबाबत विचारणा केली असता त्यांनी मोठा पॉज घेतला.

Kirit Sommaiya & Valmik Karad
Walmik Karad Update: 'मास्टरमाईंड' वाल्मिक कराडबाबत CID अन् बीड पोलिसांंना मिळाली 'ही' मोठी अपडेट; तपासाला वेग

ते म्हणाले, बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. ते त्याचा तपास शासकीय यंत्रणांमार्फत करीत आहेत. बीड येथील महादेव अॅपचे प्रकरण देखील लवकरच बाहेर येईल, अशी संयत प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बीड येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघाला होता. यावेळी आमदार सुरेश धस यांनी एकाच खात्यात ९०० कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. महादेव ॲप प्रकरण कोणत्या राजकीय नेत्याशी आणि मंत्र्यांशी संबंधित आहे याचा तपास शासन करील का? असा प्रश्न उपस्थित केला होता.

या संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्य धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. बीड जिल्ह्यातील विविध नेत्यांनीही देशमुख खून प्रकरणात महादेव ॲप प्रकरणाचाही उल्लेख केला होता. यामध्ये ९०० कोटींचा घोटाळ्या झाल्याचा आरोप केला होता.

हा आर्थिक घोटाळा असल्याने किरीट सोमय्या यांनी याबाबत बोलणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये माजी खासदार सोमय्या यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे ते महादेव ॲप या विषयावरही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र सोमय्या यांनी यावर थेट बोलणे टाळल्याने त्याची चर्चा झाली नसती तरच नवल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com