MVA Rally sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT : महाविकास आघाडीकडून शिंदे गटाचा आमदार टार्गेट, पोलिसांच्या कारवाई विरोधात 'एल्गार'

Shivsena UBT Suhas Kande : नांदगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेत्यांना संघटीत होण्यासाठी गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा मिळाला आहे.

Sampat Devgire

Shivsena UBT News : शिवसेना (ठाकरे गट) नांदगाव शहर प्रमुख संतोष गुप्ता यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या संदर्भात मंगळवारी नांदगाव शहरात बंद पुकारण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढत जिल्हा पोलिस उपअधीक्षकांना निवेदन दिले. निवेदन देताना नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्या शक्ती होत्या? हे आता पुढे येऊ लागली असल्याची चर्चा आहे.

नांदगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेत्यांना संघटित होण्यासाठी हा मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे यापुढे अधिक संघटितपणे सत्ताधारी पक्षाविरोधात आणि पोलिस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार महाविकास आघाडीचे MVA नेते व्यक्त करत आहेत.

शिवसेना Shivsena ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गणेश धात्रक म्हणाले, नांदगाव तालुक्यात काही घातक प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत. या प्रवृत्तीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना नष्ट करण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रवृत्ती अत्यंत घातक आणि समाजाच्या शत्रू आहेत.

आज आमच्यावर वेळ आली आहे. या प्रवृत्ती उद्या त्यांच्याबरोबर राहणाऱ्यांनाही असेच कारस्थान करून संपवतील,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रवृत्तींना धडा शिकविण्यात येईल नांदगाव मतदारसंघाला या प्रवृत्तींपासून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा गणेश धात्रक यांनी दिला.

यावेळी माजी आमदार अनिल आहेर (काँग्रेस), जगन्नाथ धात्रक (शिवसेना ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, विनोद शेलार, संतोष बळीद, आम आदमी पार्टीचे विशाल वडघुले, श्रावण आढाव यांसह मोठ्या संख्येने संतोष गुप्ता समर्थक कार्यकर्ते आणि व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT