Sudhakar Badgujar & Bunty Tidme Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे गटाकडून शुभेच्छांद्वारे ठाकरे गटात साखर पेरणी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणीचा प्रयत्न

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांमध्ये (Split im MLAs) फूट पडून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गट राज्यातील राजकारणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीनिमित्त (Festival wishesh) साधन नाशिकमध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे ((Uddhav Thackrey) गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत चाचपण्याचा प्रयत्न केला. (Rebel group trying to attract Corporators of Uddhav Thackrey)

जुन्या मैत्रीनिमित्त संपर्क झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. त्यातून काही नगरसेवक हाताला लागतात का याची चाचपणी सुरु असल्याचे बोलले जाते.

जून महिन्यात महाविकास आघाडीतील शिवसेना या प्रमुख पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत भाजपच्या मदतीने राज्यात सत्तांतर घडवून आणले. आता पक्ष चिन्हांवरून शिंदे गट व ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तूर्त मार्ग काढला असला, तरी धनुष्यबाणासाठी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. एकीकडे चिन्हासाठी लढत सुरू असताना, दुसरीकडे मात्र दोन्ही गट बळकट होण्यासाठी स्थानिक पातळीवर लढताना दिसत आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त दिसतोय.

दोन्ही गटांची कसोटी

शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व खासदार हेमंत गोडसे यांच्याव्यतिरिक्त दुसरा असा सक्षम नेता गटात आलेला नाही. सध्या शिंदे गटाची जी रचना दिसते त्यात समाविष्ट झालेले पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी होते. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, गट भक्कम करण्यासाठी पहिला वार शिवसेनेवरच घालण्यास सुरवात केली आहे. दीपावली शुभेच्छांचे निमित्त साधून माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात समाविष्ट होण्याची गळ घातली जात आहे.

राज्यात सत्ता आहे. भविष्यात संघटनेसह निवडणूक निवडून येण्याची संधी असल्याचे सांगून संघटनेतील पदांसंदर्भात आश्वासित केले जात आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची कसोटी आहे, तर दुसरीकडे दिवाळी शुभेच्छांचा प्रयोग यशस्वी झाल्यास शिंदे गटाच्या विस्तारवादी भूमिकेलाही मर्यादा येणार आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT