जळगाव : शिवसेनेचे (Shivsena) आमदार म्हणतात, आम्ही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गेलो. हिंदुत्वासाठी (Hindutwa) आलेला आहात. तुमचा त्याग आणि बलिदान मोठं आहे. तुम्हाला मंत्रीपदाची गरज नाही. हिदुत्वाचे काम नीटनेटकं करावं. ती अस्मिता आणि अभिमान कायम ठेवा. असच लढत रहा, असा मुख्यमंत्री शिंदे यांचा विचार असावा. (MLA gone for Hindutwa, so they do not need ministerial portfolio)
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत ते बोलत होते. श्री. खडसे म्हणाले, जवळपास चाळीस दिवसांनी का होईना मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला. होणार, होणार अशी चर्चा होती, त्याचा मुहुर्त आज निघाला. मंत्र्यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर शासनाचे कामकाज सुरु होईल अशी अपेक्षा करू या. सर्व मंत्र्यांचे मी स्वागत करतो. पुढच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जोरदार पावलं उचलावी. आता डबल इंजीनचे काम दुप्पट गतीने सुरु होईल अशी अपेक्षा आहे.
ते म्हणाले, ज्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देऊन ठेवली आहे, त्या कामांना मंत्र्यांनी गती देण्याचे काम करावे. ही कोट्यावधींची कामे आहेत. अजुनही शेतकऱ्यांना मदत झालेली नाही. विविध क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता त्यांनी वेगाने काम करावे, अशी अपेक्षा करू या.
दोन मंत्र्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याबाबत श्री. खडसे म्हणाले, गंभीर आरोप, भ्रष्ट कारभार वगैरे हे जे आहेत. भाजप, शिवसेनेच्या कालखंडात फारसे नवे राहिलेले नाहीत. पूर्वी फक्त आरोप झाला तर नाथाभाऊंना राजीनामा द्यावा लागला होता. आता आरोप नाही, तर समोर चित्र दिसते आहे, त्याचे पुरावे आहेत, तरीही त्यांच्यावर कारवाई नव्हे तर त्यांना मंत्री केले जाते. म्हणजे एकाप्रकारे इकडे आल्यानंतर, ते स्वच्छ झाले, पारदर्शी झाले. असे हे पारदर्शी सरकार आज या मंत्र्यांना घेऊन काम करते आहे. जनता सर्व पाहते आहे.
जळगाव जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले आहेत. त्यांनी डबल इंजीन म्हणून वेगाने काम करावे. नाही तर आपसात वाद होतील. पालकमंत्री मी व्हावे की कोणी व्हावे यावर वाद होऊ नये. मी श्रेष्ठ का हा श्रेष्ठ या वादाने जिल्ह्याचा विकास ठप्प होऊ नये. दोघांनी सहमतीने काम करावे.
एकनाथ शिंदे गट हिदूत्वाच्या मुद्यावर वेगळा झाल्याचा दावा ते करतात. त्यांनी सांगितले की, आम्ही अजुनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत. त्यांचेच हिदूत्व आमच्यात आहेत. मात्र बहुतांशी शिंदे गटाच्या आमदारांना या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. आता एकनाथ शिंदे यांनी ठरवलेले दिसतंय की, तुम्ही हिंदुत्वासाठी आलेला आहात. तुमचं त्याग आणि बलिदान मोठं आहे. मंत्रीपदाची गरज नाही. हिदुत्वाचे काम नीटनेटकं करावं. ती अस्मिता आणि अभिमान कायम ठेवा. असच लढत रहा. त्यासाठी मंत्रीपद हवेच असे नाही, असे मला वाटते.
शरद पवार यांना नोटीस.
लवासा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पवार कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. याबाबत विचारले असता, श्री. खडसे म्हणाले, या विषयावर मी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. विधीमंडळात चर्चा केली होती. पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेथे सर्व आक्षेपांबाबत चर्चा झाली. अनेक दिवस उच्च न्यायालयात त्याची चर्चा झाली. त्या पवार कुटुंबिय किंवा अजित पवार यांचा त्यात काही संबंध नाही, हे स्पष्ट झाले. आता नोटीस आल्याचे आज सकाळी समजले. ती कोणत्या कारणासाठी आहे, हे मला सांगता येणार नाही.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.