Jayant Patil यांचा खोचक सल्ला : मंत्रीपद न मिळालेल्यांनी हिंदुत्वासाठी त्याग करावा!

Jayant Patil म्हणाले, आपले सहकारी कसे असावेत, ही मुख्यमंत्र्यांची चॅाईस.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey) यांचे सरकार पाडण्याचे काम बंडखोरांनी हिंदूत्वासाठी (Hindutwa) केला, असे ते म्हणतात. प्रत्येक बंडखोराला (rebel) मंत्रीपद हवे होते. त्यामुळे ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांनी हिंदूत्वासाठी त्याग करावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. (Jayant patil criticised Cm for controversial ministers)

Jayant Patil
Dada Bhuse: एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंना दिले मैत्रीचे गिफ्ट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज झाला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, चाळीस दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. हा विस्तार पाहता, अनेकांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांनी आता त्याग केला पाहिजे.

Jayant Patil
Kishor Patil : चुलत बहिण ठाकरे गटात गेली तरीही बंडातील आक्रमकपणा कायम

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे हिंदूत्वासाठी सर्व केले, असे बंडखोरांनी म्हटले होते. शिवसेने विरोधात बंडखोरीत चाळीस ते पन्नास शिवसेना व अपक्ष आमदार होते. त्यांनी बंडखोरी कशासाठी केली हे लपुन राहिलेले नाही, यातील जे मंत्री होते, त्यांना अधिक चांगले खाते हवे होते. जे आमदार होते, त्यांना मंत्री व्हायचे होते. जवळ जवळ प्रत्येकालाच मंत्री व्हायचे होते. त्यांची ही आकांक्षा लपुन राहिलेली नाही. आता विस्तार झाला आहे. त्यात अपक्ष तसेच अनेकांना संधी नाही. त्यांनी नाराज होऊ नये. हिदूत्वासाठी त्याग करावा.

मंत्रीमंडळात संजय राठोड यांसह अब्दूल सत्तार या वादग्रस्त मंत्र्यांना सहभागी केल्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, कोणाला मंत्री करावे हा मुख्यमंत्र्यांचा चॅाईस आहे. याचा दुसरा अर्थ आपले सहकारी कसे असावेत, हा चॅाईस मुख्यमंत्र्यांचा आहे.

लवासा प्रकरण

उच्च न्यायालयात लवासा प्रकरणी दिर्घकाळ खटला चालला होता. त्यात सखोल तपासानंतर उच्च न्यायालयाने या प्रकारणात पावर कुटुंबियांनी कुठेही दोषी धरले नव्हते. त्यांच्यावर कुटलेही ताशेरे नाहीत. असे असताना अचानक सर्वोच्च न्यायालयातून नोटीस का आली हे तपासावे लागले. या नोटीशीची गरज नव्हती. आमचे विरोधक सध्या विरोधी पक्षांबाबत अशा कारवाईसाठी व्यस्त आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र त्याची माहिती घेतल्यावर बोलेन, असे श्री. पाटील म्हणाले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com