Sadashiv Lokhande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sadashiv Lokhande : "...अन् आरक्षणामुळे मी १७ दिवसांत खासदार झालो!"; सदाशिव लोखंडेंचं मोठं विधान

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्यात आरक्षणावरून संघर्ष पेटलेला आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची धार तीव्र असून,धनगर,मुस्लिम समाज देखील आंदोलनाच्या तयारीत आहेत. यातच आरक्षणाचे महत्त्व खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासा येथे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे अधोरेखित झाले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी सतरा दिवसांत खासदार झालो, असं मोठं विधान खासदार लोखंडे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील जैनपूर येथील कापरीनाला खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा प्रारंभ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या हस्ते झाले. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाप्रमुख सुरेश डीके, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, किसनराव गडाख उपस्थित होते.

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, "जनतेच्या आशीर्वादामुळे आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी खासदार होऊ शकलो. यानंतर जनतेने दोन वेळा खासदारकीची संधी मिळाली. विकासात्मक कामात राजकारण करत नाही, म्हणून जनता आपल्या पाठिशी आहे. याची उतराई मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Loksabha) विकास कामाच्या माध्यमातून करत राहणार आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना गती दिली आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामांना गती मिळत असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहा कोटींची प्रकल्प...

नेवासा तालुक्यातील जैनपूर येथील कापरीनालाचा प्रकल्प हा 10 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात 1 कोटी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात निधी आल्याने लगेचच कामाला सुरूवात झाल्याची तालुकाप्रमुख सुरेश डोके यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT