Shirdi Loksabha Politics: पक्ष नेतृत्वाकडून माझी शिर्डीची उमेदवारी अंतिम; घोलपांनंतर आता वाकचौरेही मैदानात

Gholap-Wakchoure Politics : उद्धव ठाकरे यांच्यासमोर उमेदवारी घोलपांना द्यायची की, वाकचौरे यांना असा मोठा पेच प्रसंग असल्याचे दिसून येत आहेत.
Gholap-wakchoure Politics :
Gholap-wakchoure Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : लोकसभा निवडणुकीला आता काही महिने बाकी असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या समोर उमेदवारी घोलपांना द्यायची की, वाकचौरे यांना असा मोठा पेच प्रसंग असल्याचे दिसून येत आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नुकतेच मातोश्री, शिवसेना भवन आणि स्मृतिस्थळावर शक्तिप्रदर्शन करत शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेवर दबाव आणला, तर माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आपण जन्माने आणि कर्माने स्थानिक असून, पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंकडून लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याने आपला उमेदवारीवरील दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना, भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आपणाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. आपल्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर मिळालेल्या आदेशानुसार आपण पूर्ण जोमाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो, असे वाकचौरे म्हणाले.

Gholap-wakchoure Politics :
Supreme Court Hearing : सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले; ‘अपात्रता कारवाईबाबत किती वेळात निर्णय घेणार, त्याचं टाइम टेबल द्या’

माजी मंत्री बबनराव घोलपही शिर्डी लोकसभेसाठी शिवसेने (उद्धव ठाकरे गट) कडून इच्छुक असल्याचे वाकचौरे यांना विचारले असता, आपण जन्माने अकोले तालुक्यातील असून, प्रशासकीय आणि सामाजिक, राजकीय सेवेत अनेक वर्षे नगर जिल्ह्यात काम करत आहोत. रामदास आठवलेंसारख्या उमेदवाराला पराभूत करून मी 2009 ला निवडून आलो. कारण शिर्डी मतदारसंघातील सर्व जाती-धर्माची जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे आता माझी उमेदवारी अंतिम समजून मी कामाला लागलो असल्याचे वाकचौरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

2009 लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी 'आपला माणूस' हे ब्रीद घेत रामदास आठवले यांचा सामना केला आहे. जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांनीही अप्रत्येक्ष भूमिका बजावत वाकचौरे यांना अनुकूल भूमिका घेतली. आताही पुन्हा शिर्डी मतदारसंघात स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रश्न आहे. यात घोलपांच्या कायदेशीर अडचणी पाहता उमेदवारीबाबत वाकचौरे यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Gholap-wakchoure Politics :
Yavatmal Crime News : आयपीएसच्या नावे फेक कॉल करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न; रायटर, तलाठ्यालाही डच्चू !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com